Tollywood: हौसेला मोल नसतं..सेलिब्रिटींच्या हौसा-मौजा तर अनेकदा सर्वसामान्यांना आश्चर्याचे धक्के देतात. अशाच एका साऊथ स्टारच्या हौसेपुढे बड्या-बड्या सिताऱ्यांची चमक देखील फिकी पडेल. एवढंच नाही तर या व्यक्तीला साऊथचा 'मुकेश अंबानी' देखील म्हटलं जातं. आम्ही बोलत आहोत ममुक्का म्हणजेच ममूटी विषयी. ज्यांच्याविषयी म्हटलं जातं की यांचा जन्म अभिनयासाठीच झाला आहे.
ममूटीचं खरं नाव मुहम्मद कुट्टी आहे आणि त्याच्याजवळ आज करोडोंची प्रॉपर्टी आहे. आता ही प्रॉपर्टी त्याला पूर्वजांकडनं मिळाली आहे तर असं नाहीय बरं का. ममूटीचं बालपण खूप गरीबीत गेलं आणि खूप साधेपणानं गेलं.
वडील शेती करायचे तर आई घर सांभाळायची. ममूटी यांना ६ भाऊ बहिण होते. ते सर्वसामान्य मुलांप्रमाणे शाळेत जायचे आणि घरी परतल्यावर मित्रांसोबत खेळायचे. ७ सप्टेंबर,१९५१ रोजी केरळच्या एका गरीब घरात जन्म घेतलेल्या ममूटीनं कधीच विचार केला नसेल की ते साऊथ इंडस्ट्रीवर राज्य करतील.
सिनेमात नेहमीच ममूटीच्या वैयक्तिक आयुष्यातील झलक पहायला मिळते. ममूटीना लहानपणापासूनच सिनेमा पाहण्याची हौस होती. आज त्यांनी ३८० हून अधिक सिनेमांत काम केलं आहे. ममूटीजवळ २१० करोडची संपत्ती आहे. तसंच, गाड्यांविषयीचं त्यांचं वेड देखील सर्वप्रचलित आहे. त्यांच्या घरासमोर एकापेक्षा एक बड्या लक्झुरीयस गाड्या पाहिल्यावर याची कल्पना येते. ममूटी साऊथ मधील पहिले अॅक्टर होते ज्यांनी ऑडी खरेदी केली होती.
एका रिपोर्टनुसार गाड्यांच्या शानदार कलेक्शनमध्ये बीएमडब्ल्यू ई 46एम 3,मिनी कूप एस,जगुआर एक्सजे,टोयोटा लॅंड क्रूजर,ऑडी ए 7, मित्सुबिशी पजेरो स्पोर्ट, टोयोटा फॉर्च्युनर यांचा समावेश आहे. या सगळ्या गाड्या 369 नंबरनं रजिस्टर्ड केल्या आहेत. ममूटीच्या कमाईविषयी बोलायचं झालं तर सिनेमांव्यतिरिक्त ते अनेक ब्रान्डचे ब्रॅन्ड एम्बेसेडर आहेत. त्यामधनं त्यांनी चांगली कमाई केली आहे.
ममूटीच्या प्रत्येक कारच्या नंबर प्लेटवर 369 हा नंबर आहे. बोललं जातं की ममूटीनं आपल्या करिअरची सुरुवात करताना एक ब्रीफकेस खरेदी केली होती,जिचा लॉक कोड 369 होता. हा नंबर त्यांना इतका आवडला की त्यांनी याच नंबरसोबत अनेक गाड्या खेरदी केल्या.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.