प्रसिद्ध पॉप गायिका शकीरा(Shakira) अडचणीत सापडली आहे. शकीरावर करोडोंचा कर चुकवल्याचा आरोप लावला गेला आहे. त्याकारणाने तिला जेलही होण्याची शक्यता आहे. शकीरावर १४.५ मिलियन युरोज म्हणजेच ११७ करोड रुपयांचा कर चुकवल्याचा आरोप लावाला गेला आहे. स्पॅनिशन वकीलाने शुक्रवारी २९ जुलै रोजी म्हटलं आहे की शकीराला ८ वर्षाची सजा व्हावी याची मागणी करणार आहोत कारण तिनं कर चुकवल्याच्या याचिकेला फेटाळून लावलं होतं. इतकंच नाही तर स्पॅनिश वकीलाने जवळ-जवळ २४ मिनियन यूरो म्हणजेच जवळपास २.४ करोड रुपयाचा दंड भरण्याची देखील मागणी केली आहे. यानंतर शकीराच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.(Spanish prosecutor asks for eight-year jail term for Shakira)
शकीराने २०१२-२०१४ मध्ये तिचा कर जमाच केला नव्हता. हा कर जवळपास १४.५ मिलियन युरोज इतका होता. शकीराच्या वकीलांनी बुधवारी एक निवेदन जारी करत म्हटलं आहे की,शकीरा आपण काहीच गुन्हा केलेला नाही याबाबत ठाम होती म्हणूनच तिनं हे प्रकरण कोर्टात जाऊ दिलं नव्हतं. शकीराला विश्वास आहे की ती गुन्हेगार नाही हे ती कोर्टात सिद्ध करेल.
कोर्टानं या प्रकरणात कोणतीही सुनावणीची तारीख घोषित केलेली नाही. शकीराच्या वकीलांनी सांगितलं की ती ग्लोबल म्यूझिक इंडस्ट्रीचं मोठं नाव आहे. ट्रायल सुरु होण्याआधी अॅग्रीमेंट होण्याची शक्यता असते.
स्पॅनिश वकीलाचं म्हणणं आहे की शकीरा २०११ मध्ये स्पेनला शिफ्ट झाली होती, जेव्हा एफसी बार्सिलोनाचा डिफेंडर जेरार्ड पिकसोबतचं तिचं रिलेशन जगासमोर आलं होतं. पण २०१५ पर्यंत बहामास मध्ये तिनं टॅक्स रेसीडन्सी कायम ठेवली. दोघांनी जूनमध्ये विभक्त होण्याची घोषणा केली होती.
शकीरा २०१३ ते २०१४ दरम्यान एका सिंगिंग कॉम्पिटिशन शो मध्ये व्यस्त होती. तिच्या वकीलांचे म्हणणे आहे की २०१४ पर्यंत तिनं जास्त पैसा हा आंतरराष्ट्रीय स्तराव केलेल्या दौऱ्यांमधून कमावला आहे. २०१५ मध्ये ती स्पेनला गेली आणि तिनं आपला सगळा कर वेळेत भरला. शकीराच्या म्हणण्याप्रमाणे तिनं स्पॅनिश कर अधिकाऱ्यांना तब्बल १७.२ मिलियन युरो इतका कर दिलेला आहे. तिच्यावर आता कोणतंही कर्ज शिल्लक राहिलेलं नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.