सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआयने तपास करावा असा निर्णय काल सर्वोच्च न्यायालयाने दिला. या निर्णयावर प्रतिक्रिया देताना बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तींवर टीका केली. टीका करताना मात्र पांडे यांचा संयम सुटलेला दिसला. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर टीका करण्याची करण्याची तिची लायकी (औकात) नाही,' असे ते म्हणाले. त्याचा जो काही समाचार घ्यायचा आहे तो आज नेटकऱ्यांनी घेतला आहे.
खरंतरं रियाने वैयक्तिक बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर टीका केलेली नाही. सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो राजकरणात अगदी सर्रास वापरला जातो तो म्हणजे गुन्हा अद्याप सिद्ध झाला नाही. रिया ही गुन्हेगार आहे की नाही हे अद्याप ठरायचे आहे. मग तिला आताच गुन्हेगार ठरवायची घाई का ? इथे रियाची बाजू घेण्याचा प्रश्न येत नाही. मात्र वास्तव काय आहे हे मांडणे संयुक्तीक ठरेल असे वाटते. रिया दोषी आहे की नाही याचा तपास आता सीबीआय करणार असून त्यानंतर तिच्याबाबत निर्णय होईल.
सीबीआय किती झटपट काम करते हे आपण आपल्या राज्यातील डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासाच्या प्रगतीवरून पाहत आहोत. परंतु एका आयपीएस आणि तेही महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांनी एका अशी प्रतिक्रिया देणं योग्य आहे ? एखाद्या राज्याचा पोलीस महासंचालक दर्जाचा अधिकारी माध्यमांसमोर राजकारणी लोकांप्रमाणे प्रतिक्रिया देताना कदाचित प्रथमच घडत असावे. ही बातमी खासकरून काही इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी अगदी खूप मोठी ऐतिहासिक बातमी असल्यासारखी दाखवली. एक दोन चॅनेल सोडले तर एकही चॅनेल काही चुकीचं वाटलं नाही. शेवटी आपल्या देशाच्या पंतप्रधानाला जे आंबा कसा खातात आणि बटवा वापरता का? असे प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांकडून अपेक्षा तरी काय करणार ? काही चॅनेलबद्दल तर बोलायलाच नकोच.
एखाद्याची लायकी काढायची झाली तर आपली तेवढी लायकी पाहिजे. तेवढी लायकी गुप्तेश्वर पांडे यांची आहे? हे तपासायला हवे. लायकी हा शब्द महासंचालक दर्जाच्या पदावर असणाऱ्या व्यक्तीबद्दल वापरू नये. पण काय करणार हा शब्द सगळ्यात जास्त त्यांनाच आवडतो म्हणूनच तो शब्द वापरतोय. एकदा का कोणताही व्यक्ती वळचणीला गेला कि काय होते याचे उदाहरण म्हणजे गुप्तेश्वर पांडे. गेल्या काही दिवसांपासून ते सुशांतसिंह प्रकरणात अगदी राजकारण्याप्रमाणे बोलताना दिसत आहे. सुशांतने अचानक गेल्याने बिहारच्या जनतेला अतीव दुःख झाले आहे अशी त्यांची भाषा जी राजकीय लोकांनाही जमणार नाही.
सुशांतच्या वडिलांनी तक्रार दिल्यानंतर त्यांनी आपले ऑफिसर मुंबईत चौकशीसाठी पाठवले. दोषी आरोपींना आपण कोणत्याही परिस्थितीत आपण सोडणार नाही अशी त्यांची वलग्ना. हे प्रकरण त्यांच्याकडे आले असते तर त्यांच्याकडून तपास पूर्ण झाला असता का? याबद्दल शंका घेण्यास जागा आहे. कारण त्यांच्या कार्यकाळातील राज्यातील अनेक प्रकरणे असे आहेत त्यांचा तपस अद्याप पूर्ण झालेला नाही. हे एवढचं नाही. २०१२ मध्ये मुझफ्फरपूर येथील एका नवरुना नावाच्या वर्षाच्या मुलीचे अपहरण झाले होते. ती केस पांडे यांच्याकडे होती. ती चौकशी अजून पूर्ण झालेली नाही. उलट हा तपास सीबीआयकडे गेल्यानंतर खुद्द पांडे यांचीच सीबीआयने चौकशी केली आहे.
हे झालं त्यांच्या प्रशासकीय सेवेबद्दल. पांडे यांना राजकारणात येण्याची प्रचंड आवड आहे. तसा प्रयत्नही त्यांनी केलाही पण यशस्वी झाला नाही. त्यांनी २००९ मध्ये राजकरणात येण्यासाठी त्यांनी व्हीआरएस घेतली होती. भाजपकडून त्यांना बक्सरमधून उमेदवारी हवी होती. पण ऐनवेळी भाजपने दुसऱ्याला उमेदवारी दिली. तरीही त्यांनी माघार न घेता निवडणूक लढवली पण ते पराभूत झाले. पराभूत झाल्यानंतर त्यांनी परत पोलीस सेवेत जाण्याचा निर्णय घेतला. तशी रीतसर विनंती राज्य सरकारला केली व ती तात्काळ मान्य करण्यात आली. द वायर आणि डेक्कन हेराल्डने दिलेल्या वृत्तानुसार पांडे यांची व्हीआरएस बिहार सरकारने मान्य केली पण ती केंद्राकडे पाठवली नाही. ती का पाठवली नाही, याबाबत राज्य सरकारने काही खुलासा केलेला नाही याबाबत उलटसुलट चर्चा चालू आहेत. अशा प्रकारे व्हीआरएस घेऊन निवृत्त झालेला अधिकारी सेवेत परत येण्याची देशातील एकमेव दुर्मिळ घटना असावी. म्हणूनच की काय पांडेही आपली जबाबदारी मुख्यमंत्र्याप्रती असो की सरकारसाठी काल सारखे विधाने करून चोखपणे पार पाडत आहेत. यासाठी त्यांना मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी समज दिली होती तरीही हे महाशय थांबायचं नाव घेत नाहीत हे विशेष.
कोणत्याही व्यक्तीबद्दल लायकी व तशा प्रकारचे वक्तव्य जाहीरपणे तेही माध्यमांसमोर करणे चुकीचं आहे. दुसऱ्याबद्दल बोलतानाही समोरच्या आदर राखला जाईल याची नेहमी काळजी घेतली गेली पाहिजे. अशी वक्तव्ये टाळली पाहिजेत खासकरून आपला लौकिक तेवढा चांगला नसल्यावर. पांडे यांनी त्यांच्या कालच्या औकातबद्दल माफी मागितली. पण त्या माफीने पुढील व्यक्तीचे जेवढे चारित्र्यहनन झाले ते कधीही भरून येऊ शकत नाही.
special article on sushant singh rajaput rhea chakroborty gupteshwar pandey and media coverage
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.