Dilip Prabhavalkar Special Award From Ashok Saraf: झी नाट्य गौरव पुरस्कार लवकरच संपन्न होणार आहे. तमाम मराठी प्रेक्षकांना झी नाट्य गौरवची उत्सुकता आहे.
यंदाच्या ‘झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळा २०२३’ (Zee Natya Gaurav Puraskar 2023) मध्ये मराठी नाट्यसृष्टीतील नामवंत कलावंत करणार रसिकांचं मनोरंजन अनेक आश्चर्यानी भारलेला हा सुंदर सोहळा रंगणार आहे.
या सोहळ्यात एक विशेष गोष्ट घडणार आहे. ती म्हणजे ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचा सन्मान होणार आहे.
(Special Award to Dilip Prabhavalkar by Ashok Saraf in zee Natya Gaurav 2023)
यंदाच्या झी नाट्य गौरव मध्ये 'विशेष रंगभूमी पुरस्कार' ह्यावर्षी प्रथमच झी मराठी कडून जाहीर करण्यात आला आणि या पुरस्काराचे मानकरी ठरले ते म्हणजे नटश्रेष्ट 'दिलीप प्रभावळकर'. दिलीप प्रभावळकर यांचा अशोक सराफ यांच्या हस्ते सत्कार झाला.
डॉ. निलेश साबळे यांनी दिलीप प्रभावळकर यांच्या हसवाफसवी नाटकातील पात्र साकारून त्यांचा कार्याचा गौरव केला.
या पुरस्कार सोहळ्यात अशोक सराफ यांच्या हस्ते दिलीप प्रभावळकर यांना मानपत्र देण्यात आले. या प्रसंगी दिलीप प्रभावळकर यांचा सन्मान करताना अशोक सराफ म्हणाले.. जो रोल हा करेल तो रोल त्यांच्या नावाने ओळखला जातो.."
अशा शब्दात अशोक मामांनी दिलीप प्रभावळकर यांचं कौतुक केलं. याप्रसंगी दिलीप प्रभावळकर आनंदाने शुभेच्छांचा स्वीकार करत होते.
यंदाचा नाट्यगौरव फार खास असणार आहे. या सोहोळ्यात प्रेक्षकांना मराठी नाट्यसृष्टीत आघाडीचा नट शैलेंद्र दातार, उमेश जगताप आणि सुबोध भावे ‘अश्रूंची झाली फुले' ह्या नाटकातील प्रवेश सादर करणार आहे
तसेच तब्बल २५ वर्षानंतर संतोष पवार 'यदा कदाचित' ह्या नाटकाचा प्रवेश कमलाकर सातपुते, आशिष पवार, शलाका पवार आणि संजय खापरे सारखे कलाकार साकारणार आहेत,
विनोदाचा हुकमी एक्का आणि गेली २५ वर्ष रंगभूमीवर धुमाकूळ घालत असलेले नाटक "सही रे सही" नाटकाचा प्रवेश भरत जाधव सादर करणार आहे.
‘चारचौघी’ या गाजत असलेल्या हाऊसफुल्ल नाटकांमधील नाट्यप्रवेश संवेदनशील अभिनेत्री मुक्ता बर्वे साकारणार असून ह्या नाट्यप्रवेशाच्या माध्यमातून मुक्ता बर्वे ह्या वंदना गुप्ते यांना मानवंदना देणार आहे. सोबत ‘मन्या आणि मनीची’ धमाल अनुभवता येणार आहे.
यंदाच्या झी नाट्यगौरव पुरस्कार सोहळ्याचे लेखन केलंय ते संकर्षण कऱ्हाडे याने. तेव्हा एका तिकिटात बालगंधर्व ते सही रे सही पर्यंतची हाउसफुल्लचे बोर्ड झळकवलेल्या नाटकांचे प्रयोग पाहण्याची संधी रसिक प्रेक्षकांना मिळणार आहे,
झी नाट्यगौरव पुरस्कार २०२३ हा सोहळा ९ एप्रिलला संध्या. ७ वा. झी मराठीवर पाहता येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.