Squid Games actro o yeong su indicted for sexual assault denies allegations
Squid Games actro o yeong su indicted for sexual assault denies allegations Google

Hollywood: महिलेला चुकीचा स्पर्श केल्यानं 78 वर्षीय अभिनेता अडचणीत, लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल

नेटफ्लिक्स वरील प्रसिद्ध सीरिज 'स्क्विड गेम' मधील अभिनेता ओ येओंग-सु वर लैंगिक शोषणाचा आरोप झाला असला तरी त्यानं त्याचं खंडन केले आहे.
Published on

Hollywood: नेटफ्लिक्सचा सगळ्यात प्रसिद्ध कोरियन शो 'स्क्विड गेम' मध्ये नंबर 001 ही व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता ओ येओंग-सु विषयी एक शॉकिंग बातमी समोर येत आहे. या अभिनेत्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला आहे. ७८ वर्षाच्या या अभिनेत्यावर आरोप आहे की त्यानं २०१७ मध्ये एका महिलेला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श केला होता. पण अभिनेत्यानं या आरोपाचं खंडन केलं आहे.(Squid Games actro o yeong su indicted for sexual assault denies allegations)

Squid Games actro o yeong su indicted for sexual assault denies allegations
Manasi Naik: 'माझी मुलींना हात जोडून विनंती...'; लग्न करताना कुठे चुकलं यावर स्पष्टच बोलली मानसी नाईक

ओ येओंग-सु हा पहिला कोरियन अभिनेता आहे ज्याला हॉलीवूडच्या सगळ्यात प्रतिष्ठित पुरस्कारांमधला एक मानला जाणारा गोल्डन ग्लोब पुरस्कार देण्यात आला आहे. मीडियाला मिळालेल्या वृत्तानुसार कळत आहे की ओ येओंग-सु वर डिसेंबर २०२१ मध्ये पीडित महिलेनं आरोप केले होते. पण ही केस एप्रिल २०२२ मध्ये बंद केली गेली. त्यावेळी अभिनेत्यावर कोणतेही चार्ज लावण्यात आले नाहीत ही गोष्ट देखील समोर आली होती.

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

Squid Games actro o yeong su indicted for sexual assault denies allegations
Vikram Gokhale:'जिंदगी अधूरी है मेरे दोस्त..',अनुपम खेरनी शेअर केलेला विक्रम गोखलेंचा Unseen Video चर्चेत

पण आता पीडित महिलेनं पुन्हा ही केस ओपन करण्याच धोशा लावला अन् त्यामुळे पोलिसांना पुन्हा याची दखल घ्यावी लागली. सुनावणी दरम्यान ओ येओंग सु यानं या सगळ्या आरोपांना खोटे आरोप म्हणत ते अमान्य केले आहेत. तो म्हणाला ,''मी त्या महिलेला फक्त रस्ता दाखवण्यासाठी तिचा हात पकडला होता. मी त्यासाठी तिची माफी मागितली कारण तिनं तेव्हा मला धमकी दिली होती की ती हा विषय मोठा करेल. पण याचा अर्थ असा नाही की मी चुकीच्या हेतूने स्पर्श केला होता आणि मी या आरोपाला मान्य करतो आहे''.

Squid Games actro o yeong su indicted for sexual assault denies allegations
Vikram Gokhale Demise: ''ते सेटवर आले की...'', विक्रम गोखले यांच्या शेवटच्या मालिकेच्या आठवणी

ओ येओंग-सु हा साउथ कोरियाचा प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याचा जन्म १९४४ मध्ये Kaesong मध्ये झाला होता,जो प्रदेश आता नॉर्थ कोरियात मोडतो. त्यानंतर तो आपल्या कुटुंबासोबत अमेरिकेत रहायला गेला. १९६७ मध्ये अभिनेत्यानं आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यानं जास्तीत जास्त काम हे ड्रामा थिएटरसाठी केलं आहे. त्यानं २०० हून अधिक स्टेज प्ले मध्ये काम केलं आहे.

अभिनेता ओ येओंग-सु ला नेटफ्लिक्सचा शो स्क्विड गेम च्या माध्यमातून ओळख मिळाली आहे. या सिरीजनं जगभरात पसंती मिळवली होती. या सिरीजमधील कलाकार देखील प्रसिद्ध झाले होते. ७८ वर्षीय ओ येओंग-सु चे काम कोरियातच नाही हॉलीवूडमध्ये देखील पसंत केलं गेलं. यामुळेच त्याला उत्कृष्ट सहकलाकाराचा पुरस्कार सीरिजसाठी मिळाला होता. तसंच गोल्डन ग्लोब पुरस्कारानं देखील त्याला सम्मानित करण्यात आलं होतं. ड्रामा थिएटरमधील उल्लेखनीय कामगिरी बद्दलही अभिनेत्याला अनेकदा नामांकने मिळाली आहेत. पण आता त्याच्यावर लागलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपानं त्याच्या उज्ज्वल कारकिर्दीला एकप्रकारे गालबोटच लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()