Shehan Karunatilaka: लेखक शेहान करुणातिलक यांना बुकर पुरस्कार, रक्कम ऐकून फिट येईल..

'बुकर' हा लेखनातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो.
Sri Lankan author Shehan Karunatilaka wins 2022 Booker Prize For The Seven Moons of Maali Almeida
Sri Lankan author Shehan Karunatilaka wins 2022 Booker Prize For The Seven Moons of Maali Almeidasakal
Updated on

Shehan Karunatilaka: आपल्याला साहित्याचा मोठा वारसा आहे. त्यामुळे कथा, कादंबरी, कविता अशा विविध साहित्य प्रकारात लेखन करणाऱ्या लेखन कवींचा कायमच यथोचित सन्मान केला जातो. असे अनेक नामांकित पुरस्कार आपल्याला परिचित असतीलच पण एक असा पुरस्कार आहे ज्याची रक्कम ऐकून कुणालाही धक्का बसू शकतो. आणि हा पुरस्कार मिळाला आहे. श्रीलंकेतील शेहान करुणातिलक या लेखकाला.. तर जाणून घेऊया नेमका हा पुरस्कार काय आहे, आणि पुरस्काराची रक्कम किती आहे..

(Sri Lankan author Shehan Karunatilaka wins 2022 Booker Prize For The Seven Moons of Maali Almeida)

या पुरस्काराचे नाव आहे 'बुकर'. हा लेखनातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. यंदाचा बुकर पुरस्कार लंडन येथील लेखक शेहान करुणातिलक यांना घोषित करण्यात आला. त्यांच्या ‘द सेवन मून्स ऑफ माली अल्मेडा’ या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

Sri Lankan author Shehan Karunatilaka wins 2022 Booker Prize For The Seven Moons of Maali Almeida
Urfi Javed: असशील मोठी! जया बच्चन यांच्या त्या कृत्यावर भडकली उर्फी, म्हणाली..

हा पुरस्कार मिळवणारे करुणातिलक हे श्रीलंकेतील दुसरे लेखक आहेत, त्यामुळे हा अत्यंत मोठा मान त्यांना मिळाला आहे. 1992 मध्ये ‘द इंग्लिश पेशेंट’ या पुस्तकासाठी माइकल ओंडात्जे या श्रीलंकन लेखकाला हा पुरस्कार देण्यात आला होता. त्यानंतर जवळपास 30 वर्षांनी हा पुरस्कार करुणातिलक त्यांना देण्यात आला आहे.

Sri Lankan author Shehan Karunatilaka wins 2022 Booker Prize For The Seven Moons of Maali Almeida
Varsha Dandale: 'यांना काही काम धंदे नाहीत का?' वच्छी आत्या भाकडल्या..

सोमवारी 17 ऑक्टोबर रोजी रात्री लंडन येथे झालेल्या सोहळ्यात हा पुरस्कार करुणातिलक यांना प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांना पुरस्कार स्वरूपात 50000 ग्रेट ब्रिटन पाउंड रुपये देण्यात आले. म्हणजे भारतीय रुपयानुसार अंदाजे 47 लाख रुपये ही पुरस्काराची रक्कम आहे. करुणातिलक हे 47 वर्षिय लेखक आहेत. इतक्या कमी वयात हा पुरस्कार मिळवणारे करुणातिलक पहिलेच आहेत.

स्वतंत्र प्रेस ‘सॉर्ट ऑफ बुक्स’ द्वारे प्रकाशित ‘द सेवन मून्स ऑफ माली अल्मेडा’ हे पुस्तक अत्यंत रहस्यमय आहे. त्यातील कथेचा काळ हा 1990 असून सिव्हिल वॉर आणि मृत्यूनंतरचे काल्पनिक जग लोकांसमोर आणणारी ही कादंबरी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.