Sridevi Death Case: श्रीदेवी मृत्यूप्रकरणात PM मोदी, संरक्षणमंत्र्यांच्या बनावट पत्राचा हवाला, CBI चे स्वयंघोषित गुप्तहेराविरोधात आरोपपत्र

Sridevi Death Case: दीप्ती आर पिन्निती ज्यांनी विविध YouTube व्हिडिओवर दावा केला होता की श्रीदेवीच्या मृत्यूबद्दल भारत आणि यूएई सरकार यांच्यात लपवाछपवी करण्यात आली होती.
Sridevi Death Case
Sridevi Death Case
Updated on

Sridevi Death Case:

दीप्ती आर पिन्निती ज्यांनी विविध YouTube व्हिडिओवर दावा केला होता की श्रीदेवीच्या मृत्यूबद्दल भारत आणि यूएई सरकार यांच्यात लपवाछपवी करण्यात आली होती. मात्र ती बनावट कागदपत्रांच्या आधारे आरोप करत होती, असे सीबीआयने म्हटले आहे. सीबीआयने आता भुवनेश्वरस्थित दीप्तीविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. ती स्वत:ला खासगी गुप्तहेर असल्याचे देखील सांगत होती.

दीप्तीने सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूबाबतही असाच खळबळजनक दावा केला होता. फेब्रुवारी २०१८ मध्ये बाथटबमध्ये बुडून श्रीदेवीचा दुबईत मृत्यू झाला होता. 14 जून 2020 रोजी सुशांत सिंग राजपूत त्याच्या खोलीच्या गळफास घेतल्याच्या अवस्थेत सापडला होता.

विशेष न्यायालयात सादर केलेल्या सीबीआयच्या अहवालानुसार, यूट्यूबवरील चर्चेदरम्यान पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री यांच्याशी संबंधित कागदपत्रे बनावट असल्याचे तपासात उघड झाले आहे. सीबीआयने पिन्निती आणि कामथ यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत 120-बी (गुन्हेगारी कट), 465, 469 आणि 471 अंतर्गत आरोपपत्र दाखल केले आहे. (Latest Entertainment News)

Sridevi Death Case
Shahid Kapoor : अक्षयच्या पाठोपाठ आता शाहिद साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका? दिग्दर्शकासोबत सुरुये चर्चा

काय म्हणाले अधिकारी?-

अधिकाऱ्यांनी सांगितले की, सीबीआयने गेल्या वर्षी मुंबईतील वकील चांदनी शाह यांच्या तक्रारीनंतर भुवनेश्वरच्या दीप्ती आर. पिन्नीती आणि त्यांचे वकील भरत सुरेश कामथ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. चांदनी शाह यांनी आरोप केला आहे की पिन्नीतीने पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांची पत्रे, सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित कागदपत्रे आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) सरकारच्या रेकॉर्डसह अनेक दस्तऐवज तयार केले, जे बनावट असल्याचे दिसून आले.

फेब्रुवारी 2018 मध्ये श्रीदेवी यांचे दुबईत निधन-

फेब्रुवारी 2018 मध्ये दुबई, यूएई येथे श्रीदेवी यांचे निधन झाले. पिन्नीतीने एका मुलाखतीत श्रीदेवीच्या मृत्यूबाबत धक्कादायक दावा केला होता. गेल्या वर्षी पिन्नितीच्या विरोधात एफआयआर नोंदवल्यानंतर, सीबीआयने 2 डिसेंबर रोजी भुवनेश्वरमधील त्याच्या निवासस्थानाची झडती घेतली होती, ज्यामध्ये फोन आणि लॅपटॉपसह डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली होती. सीबीआयने आरोपपत्र दाखल केल्याबाबत पिन्निती म्हणाल्या, सीबीआयने माझे म्हणणे न नोंदवता माझ्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. (Latest Marathi News)

Sridevi Death Case
Sanjay Leela Bhansali Movie : संजय लीला भन्साळींचा 'तो' मास्टरपीस आता 'नेटफ्लिक्स'वर प्रदर्शित!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.