sakal premier awards 2023: श्रीकांत शिंदें मनोरंजन विश्वात पदार्पण करणार? 'सकाळ' प्रीमियर सोहळ्यात म्हणाले, 'अभिनेता झालो तर..'

sakal premier awards 2023:
sakal premier awards 2023:Esakal
Updated on

Sakal Premier Award 2023:‘सकाळ प्रीमियर पुरस्कार सोहळ्या’चे यंदाचे तिसरे वर्ष होते. मराठी चित्रपटसृष्टीतील अवघे तारांगण त्यासाठी डाॅ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात अवतरले होते.

खासदार श्रीकांत शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, ठाण्याचे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, माजी नगरसेवक संजय वाघुले इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत चित्रपट, नाट्य आणि वेबसीरिज क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव करण्यात आला.

sakal premier awards 2023:
Parineeti Chopra: राघवसोबतच्या लग्नाच्या बातम्यांदरम्यान परिणीतीला मिळाला मोठा प्रोजेक्ट, या चित्रपटाचा होणार भाग

‘धर्मवीर’ चित्रपट बनवताना अनेक अनुभव आले. त्या अनुभवांची शिदोरी घेऊन ठाण्यामध्ये ‘धर्मवीर चित्रपट सृष्टी उभी करणार आहोत. त्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे, असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या ‘प्रीमियर अवॉर्ड २०२३’ सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी शिंदे यांच्या हस्ते ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांना ‘जीवन गौरव पुरस्कारा’ने गौरवण्यात आले.

sakal premier awards 2023:
Shaakuntalam: समांथाची बॉक्स ऑफिसवर हवा! 'शाकुंतलम'नं पहिल्या दिवशी कामवला इतक्या कोटींचा गल्ला..

राजदत्त यांनी अनेक दर्जेदार चित्रपट बनवले. त्या चित्रपटांनी मराठी चित्रपटसृष्टी अधिक समृद्ध केली. त्यातील अनेक चित्रपट पाहिले आहेत; मात्र अलीकडे असे चित्रपट बघायला मिळत नाहीत. त्यामुळे नवीन पिढीपर्यंत दर्जेदार चित्रपटही पोहोचत नाहीत. अशा कलाकृती ‘चित्रपट महोत्सवा’च्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रयत्न करू, असे श्रीकांत शिंदे म्हणाले.

'सकाळ' समूहाचे कौतुक

प्रीमियर अवॉर्ड' सोहळा ठाण्यात आयोजित केल्याबद्दल खासदार श्रीकांत शिंदे यांनी 'सकाळ'चे मनःपूर्वक आभार मानले. 'सकाळ'ची उज्ज्वल पत्रकारितेची ९१ वर्षांची परंपरा आहे. अनेक अडचणींचा सामना करत त्यांनी ही परंपरा कायम ठेवली हे स्तुत्य आहे, असे सांगत त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार आणि कालाकृतींचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केल्याबद्दल 'सकाळ' माध्यम समूहाचे कौतुक केले.

sakal premier awards 2023:
Sakal Premier Awards : ‘सकाळ प्रीमियर’ सोहळ्यात चित्रकर्मींचा गौरव; ‘वाळवी’ सर्वोत्कृष्ट चित्रपट

मी नेता आहे, अभिनेता झालो तर 'जास्त' होईल!

एखाद्या अभिनेत्याला शोभणारा चेहरा असल्याने आपण कधी कॅमेऱ्याच्या पुढे येण्याचा प्रयत्न कराल का, असा प्रश्न श्रीकांत शिंदे यांना अभिनेता पुष्कर क्षेत्री यांनी विचारला. त्यावर उत्तर देताना शिंदे यांनी सांगितले, की मी नेता आहे... अभिनेता झालो तर 'जास्त' होईल. शिंदे यांची मिश्कील टिप्पणी ऐकताच नाट्यगृहात जोरदार खसखस पिकली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.