Jawan: "बेटे को हाथ लगाने से पहले..", डायलॉग स्क्रिप्टमध्येच नव्हताच, मग कसा आला? लेखकाने केला खुलासा

जवान मध्ये गाजलेला संवाद मूळ स्क्रिप्टमध्ये नव्हताच, वाचा सविस्तर
srk jawan famous dialogue bete ko hath lagane se pehle not in the script revealed by writer sumit arora
srk jawan famous dialogue bete ko hath lagane se pehle not in the script revealed by writer sumit arora SAKAL
Updated on

जवान सिनेमात एक संवाद खुप गाजला. तो म्हणजे बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर. जवान सिनेमाचा हा संवादाचा संबंध समीर वानखेडे - आर्यन खान केसशी संबंधित असल्याची चर्चा होती.

हा संवाद लिहीलाय लेखक सुमित अरोराने. सुमितने जवानमधला हा संवाद लिहीलाय. हा संवाद मूळ स्क्रिप्टमध्ये नव्हताच. मग सिनेमात कसा आला याचा किस्सा स्वतः लेखक सुमित अरोराने शेअर केलाय.

(srk jawan famous dialogue bete ko hath lagane se pehle not in the original script revealed by sumit arora)

srk jawan famous dialogue bete ko hath lagane se pehle not in the script revealed by writer sumit arora
Rekha Video: फोटो काढायला आलेल्या फॅनला रेखाने मारली चापट, पुढे घडलं असं काही की..., व्हिडीओ व्हायरल

सुमीत अरोरा लिहीतो, "ही एक अशी कथा आहे जी तुमचा चित्रपट निर्मितीच्या जादूवर विश्वास ठेवेल. जवानमधली ती ओळ आमच्या स्क्रिप्टमध्ये कधीच नव्हती. तो 'क्षण' जिथे SRK सरांची व्यक्तिरेखा ती ओळ म्हणते. आम्हा सर्वांना माहित होते की तो सिनेमातील एक महत्वाचा आणि स्ट्रॉंग क्षण आहे. अशावेळी संवादाशिवाय सुद्धा तो क्षण उठावदार झाला असता. पण शूटिंग करताना वाटत होते की, त्या प्रसंगी काहीतरी एक ओळ असावी."

सुमित पुढे म्हणाला,"मी तिथे सेटवर होतो. त्यावेळी शाहरुख सर तो सीन करताना पाहताच माझ्या तोंडून पहिले शब्द निघाले: 'बेटे को हाथ लगाने से पहले, बाप से बात कर'. हा संवाद त्या प्रसंगाला अगदी स्पष्ट वाटला. दिग्दर्शक ऍटली आणि SRK सर दोघांनाही ते योग्य वाटले आणि शॉट घेण्यात आला," तो पुढे म्हणाला.

सुमित अरोरा म्हणाले की, टीमला अपेक्षा नव्हती की हा डायलॉग अशा प्रकारे लोकांमध्ये फेमस होईल. गाजेल

सुमित म्हणतो, "एसआरके सरांनी ज्याप्रकारे हा डायलॉग पोहोचवला ते खुप प्रभावी होते. पण ती ओळ इतकी हिट होईल आणि लोकांच्या मनात राहील असे आम्हाला कधीच वाटले नव्हते. एक लेखक म्हणून तुम्ही फक्त एक ओळ लिहू शकता पण त्याचे नशीब पुढेच ठरते,"

अरोराच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये कबीर खानचा “चंदू चॅम्पियन” असून त्यात कार्तिक आर्यन आणि राज निदिमोरू आणि कृष्णा-दिग्दर्शित “सिटाडेल” ची भारतीय आवृत्ती समाविष्ट आहे.

"जवान" या चित्रपटात नयनतारा आणि विजय सेतुपती तसेच दीपिका पदुकोण यांच्याही विशेष भूमिका आहेत. तो 7 सप्टेंबर रोजी हिंदी, तमिळ आणि तेलगूमध्ये जगभरात प्रदर्शित झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.