टाइम्स स्क्वेअरमध्ये झळकली मराठी पोट्टी!; 'मै नही तो कौन?' वाल्या सृष्टीसाठी चाहत्याची खास पोस्ट

Srushti tawade displayed in times square billboard fan wrote emotional post about her early days
Srushti tawade displayed in times square billboard fan wrote emotional post about her early days
Updated on

Srushti Tawade: मागच्या काही दिवसात सोशल मीडियामधून प्रसिध्द झालेला चेहरा सृष्टी तावडे हिने रॅप संगीत जगतात खळबळ उडवून दिली. हसल 2.0 या रॅप रिअॅलीटी शोमधून पुढं आलेली ही मराठमोळी रॅपर जिने हिप-हॉपच्या जगात स्वतःची खास ओळख बनवली आहे.

नुकतीच ती न्यूयॉर्क मधील प्रसिध्द टाइम्स स्क्वेअर मध्ये झळकली. यानंतर सृष्टीचा अगदी तिच्या करिअरच्या सुरूवातीच्या काळापासून चाहता राहिलेल्या एका इंटरनेट यूजरची सोशल मीडिया पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.

सृष्टी जेव्हा कमी प्रसिद्ध होती तेव्हा तिच्यासाठी बॉब नावाच्या ट्विटर यूजरने शेअर केलेली इंस्टा स्टोरी पुन्हा शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तो सृष्टीचं कौतुक करत आहे आणि तिला कोणीतरी काम देण्याची विनंती करत आहे.

सृष्टीचा चेहरा टाइम्स स्केवअर मधील बिलबोर्डवर झळकल्यानंतर त्यांने या दोन्हीचे फोटो एकत्र शेअर केले आगेत. यासोबतच त्यांने एक भावनीक संदेश देखील लिहीला आहे.

हेही वाचा - मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

Srushti tawade displayed in times square billboard fan wrote emotional post about her early days
MPSC Recruitment 2023: MPSCच्या इतिहासात सर्वात मोठी भरती! 'इतक्या' पदांसाठी निघाली जाहिरात

बॉबने या फोटोंसोबत लिहीलं की, "एक वर्षापूर्वी आजच्या दिवशी मी सृष्टीची ही रील शेअर केली होती,या आशेने की कोणीतरी प्रभावशाली प्रतिभेचे हे पॉवरहाऊस शोधून तिला कामावर घेईल.मी साशंक होतो कारण तिचा आवाज अनोखा होता आणि आम्ही भारतीय लोक बहुतेक नवीन गोष्टीचे स्वागत करत नाही."

पुढे तो लिहीतो की, "पण या मुलीने सगळ्यांना ऐकायला भाग पाडलं. मी मदत करण्याचा प्रयत्न करत होतो, मला कदाचित ठावूक नव्हतं की तिला कशाचीही गरज नाही, मला माहित नव्हते की एका वर्षानंतर ती टाइम स्क्वेअरवर झळकेल आणि देशात तीच्या नावाता बोलबाला असेल.

जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची आवड असेल, तर ते करत राहा, जेव्हा तुम्ही निराश असाल, तेव्हा माझ्याप्रमाणे सृष्टीसारख्या लोकांकडून प्रेरणा घ्या."

Srushti tawade displayed in times square billboard fan wrote emotional post about her early days
Video : मुंबई मेट्रो प्रवासादरम्यान PM मोदींचा विद्यार्थ्यांना खास प्रश्न; म्हणाले, 'तुम्ही 15 मिनिटं…'

सृष्टी आहे तरी कोण?

आज सुष्टी तावडे हे नाव सगळ्यांच्या परिचयाचं झालं आहे. सृष्टी ही महाराष्ट्रात राहणारी असून हसल 2.0 मध्ये येण्यापूर्वी ती एक कंटेट रायटर म्हणून काम करत होती.

मुंबईत जन्म झालेल्या सृष्टीचं वय अवघं 20 वर्षे आहे. तिच्या चिल किंडा, भगवान बोल रहा हू, छोटा डॉन, मेरा बचपन कहा गया आणि 'मैं नही तो कौन बे'सारख्या रॅप गाण्यांना चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.