ऑस्कर पुरस्कार मिळणे आणि या मोठ्या सोहळ्याचा भाग बनणे ही मोठी गोष्ट आहे. 12 मार्च रोजी, आरआरआर चित्रपटातील नाटु-नाटु या गाण्याने ऑस्कर जिंकून संपूर्ण देशाला आनंद दिला आहे.
हा क्षण संपूर्ण भारतासाठी अभिमानाचा होता. प्रत्येक भारतीयाच्या चेहऱ्यावर मोठे हास्य होते. परदेशात नाटु-नाटुची खूप चर्चा झाली. सगळ्यांच्या ओठांवर फक्त आरआरआरचं नाव होतं.
पण तुम्हाला माहीत आहे का की ऑस्कर सोहळा पाहण्यासाठी आणि त्यात सहभागी होण्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागते. जर तुम्ही विचार करत असाल की नाटु-नाटु या गाण्याच्या नॉमिनेशनमुळे RRR चित्रपटाच्या टीमला या मोठ्या कार्यक्रमात फ्रीमध्ये सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली, तर आम्ही तुम्हाला सांगतो की, तसे अजिबात नाही. ऑस्कर 2023 मध्ये, राजामौली, रामचरण आणि ज्युनियर एनटीआरसह चित्रपटातील अनेकांना एंट्री फ्री नव्हती.
ऑस्कर सेरेमनीसाठी जागा राखून ठेवण्यासाठी चित्रपटाच्या टीमने किती पैसे खर्च केले होते? हा सर्व खर्च चित्रपटाचे दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी केला होता. मिळालेल्या माहितीनुसार, केवळ नाटु-नाटु चे संगीतकार एमएम कीरावानी आणि गीतकार चंद्र बोस यांना ऑस्करमध्ये मोफत पास देण्यात आले होते.
पण सर्वांनी पाहिले की, एसएस राजामौली, ज्युनियर एनटीआर, राम चरण आणि इतर काही कुटुंबातील सदस्यही या मोठ्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या सर्वांसाठी वेगळे तिकिटे काढण्यात आली.
एका वृत्तवाहिनीच्या बातमीनुसार, ऑस्कर 2023 च्या तिकिटाची किंमत $25,000 आहे, जी भारतीय रुपयानुसार सुमारे 20.6 लाख आहे. अहवालांवर विश्वास ठेवला तर ऑस्कर पास फक्त विजेत्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांनाच दिले जातात.
इव्हेंट लाईव्ह पाहण्यासाठी प्रत्येकाला तिकीट खरेदी करावे लागते. मात्र, काही चाहत्यांचे असे म्हणणे आहे की, तिकीट खरेदी करूनही आरआरआरच्या टीमला शेवटच्या ओळीत जागा देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.