भारतातील सर्वात प्रभावी दिग्दर्शक म्हणून आता एस एस राजामौलींच्या नावाचा उल्लेख केला जातो आहे. त्यांनी केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही भारताच नाव मोठं केलं आहे. त्याच्या मख्खी, बाहुबली आणि आता आरआरआर सारख्या चित्रपटांना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. त्यांनी मनोरंजन विश्वाला 'बाहुबली' आणि आरआरआर या चित्रपटांसह इतिहास रचला आणि थेट ऑस्कर पर्यंत मजल मारली.
(SS Rajamouli Wanted To Make A Film On Indus Valley Civilization But Pakistan Denied Permission )
मात्र त्याचे एक स्वरप्न अपुर्ण राहिल्याचं त्यांनी अपल्या ट्विटमधून नुकतच सांगितलं. त्याच झालं असं की, राजामौली यांना भारतातील प्राचीन संस्कृतींपैकी एक असलेल्या सिंधू संस्कृतीवर चित्रपट बनवण्याची इच्छा होती. मात्र आपला शेजारील देश पाकिस्तान यांनी त्यांच्या या कल्पनेला आड काठी घातली आहे. याचा खुलासा स्वत: राजामौली यांनी सोशल मीडियावर केला आहे.
उद्योगपती आणि महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी रविवारी एक ट्विट रिट्विट केले. यामध्ये हडप्पा, मोहेंजोदारो, कालीबंगा आणि लोथलसह सिंधू संस्कृतीच्या प्राचीन शहराची सुंदर चित्र पाहायला मिळाले होते.
हे फोटो शेअर करत आनंद महिंद्रा यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, 'हे अप्रतिम चित्रण आहेत, जे इतिहासाला जिवंत करतात आणि आपली कल्पनाशक्ती जागृत करतात.' आपल्या ट्विटमध्ये एसएस राजामौली यांना टॅग करत आनंद महिंद्रा यांनी पुढे लिहिले की, 'त्या युगावर आधारित चित्रपटाचा विचार करा, ज्यामुळे प्राचीन सभ्यतेबद्दल जागतिक जागरूकता निर्माण होईल.'
त्यानंतर राजामौली यांनी लिहिले “नक्कीच सर. ‘मगधिरा’च्या चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान गुजरातच्या धोलावीरा परिसरात मला एक झाड दिसले होते, झाड इतके जुने होते आणि खूप प्राचीन होते . त्यावेळी मी सिंधू संस्कृतीवर चित्रपट बनवायचा विचार केला होता. काही वर्षांनी मी पाकिस्तानमध्येही गेलो, मोहेंजो दारोला जाऊन भेट द्यायचा खूप प्रयत्न केला, पण . दुर्दैवाने, परवानगी नाकारण्यात आली.”
आनंद महिंद्रा यांच्या या ट्विटला एसएस राजामौली यांनी उत्तर देतांना काही वर्षांपूर्वी त्यांना पाकिस्तानमधील मोहेंजोदारोला जाण्याची परवानगी कशी देण्यात आली नाही, ही धक्कादायक बाब त्यांनी यावेळी सांगितली.
मोहेंजो दारो हे पाकिस्तानमधील सिंधू नदीच्या काठावरील जागतिक वारसा लाभलेलं स्थळ आहे, ज्यामध्ये सिंधू संस्कृतीचे काही अवशेष आहेत. आशुतोष गोवारीकर यांनी बॉलिवूडमध्ये यापूर्वी एक पिरियड ड्रामा बनवला आहे, ज्यामध्ये या प्राचीन सभ्यतेची झलक पाहायला मिळते. एसएस राजामौली यांच्या आगामी सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर, ते दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता महेश बाबूसोबत SSMB29 हा सिनेमा घेऊन येत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.