Hollywood Strike RRR: हॉलीवुडच्या आंदोलनात RRR चं पोस्टर झळकलं, सिनेमाची अशीही हवा

RRR ने त्याच्या नाटू नाटू गाण्यासाठी ऑस्कर जिंकल्यावर त्याला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली.
SS Rajamouli's RRR poster spotted during Hollywood actors writers SAG-AFTRA strike
SS Rajamouli's RRR poster spotted during Hollywood actors writers SAG-AFTRA strikeSAKAL
Updated on

Hollywood Strike RRR Poster: एरवी शांत असलेल्या हॉलीवुडचं वातावरण सध्या पेटलंय. 14 जुलै रोजी मध्यरात्री, स्क्रीन अ‍ॅक्टर्स गिल्ड-अमेरिकन फेडरेशन ऑफ टेलिव्हिजन अँड रेडिओ आर्टिस्ट्स (SAG-AFTRA) स्ट्राइक झाला ज्यामुळे मनोरंजन उद्योग हादरला.

हॉलीवूडमधील 63 वर्षातील हे पहिलं आणि मोठं स्ट्राईक आहे! SAG-AFTRA ने जाहीर केले होते की ते लेखकांच्या संपात सामील होणार आहेत.

मुख्यत: खराब कामाची परिस्थिती आणि कमी पगारामुळे असोसिएशनने संप जाहीर केला आहे. संपादरम्यान एक विशेष गोष्ट घडली ती म्हणजे.. एसएस राजामौली यांच्या RRR चित्रपटाचे पोस्टर दिसले!

(SS Rajamouli's RRR poster spotted during Hollywood actors writers SAG-AFTRA strike)

SS Rajamouli's RRR poster spotted during Hollywood actors writers SAG-AFTRA strike
Baipan Bhaari Deva: ही तर आमची.. केदार शिंदेंनी बाईपण भारी देवा मधील शशीला दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा

आंदोलनात RRR चं पोस्टर

अलायन्स ऑफ मोशन पिक्चर अँड टेलिव्हिजन प्रोड्युसर्ससोबत नवीन कामगार करार करण्यात युनियन अयशस्वी ठरल्यानंतर स्क्रीन अ‍ॅक्टर्स गिल्डने संपाची घोषणा केली.

या संपामुळे आगामी अनेक शो आणि चित्रपटांच्या शूटिंगवर परिणाम झाला आहे. 14 जुलै रोजी मध्यरात्री, SAG-AFTRA ने घोषणा केली की ते लेखकांच्या संपात सामील होणार आहेत.दरम्यान, इंटरनेटवर फिरत असलेल्या एका फोटोमध्ये, संपावरील एका होर्डींगवर RRR चे पोस्टर दिसले.

दरम्यान संपात एक माणुस राम चरण आणि ज्युनियर NTR यांच्या RRR मधील नाटू नाटू मधून त्यांची हुक स्टेप करत असलेले पोस्टर हातात घेऊन टोपी घातलेला एक माणूस स्ट्राइकमध्ये चालताना दिसत आहे.

त्याच्या होर्डींगवर stRRRike असं लिहीलेलं दिसतंय. एकुणच RRR ला खऱ्या अर्थाने जागतिक ओळख मिळाली असं म्हटल्यास वावगं ठरु नये. RRR ने त्याच्या नाटू नाटू गाण्यासाठी ऑस्कर जिंकल्यावर त्याला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली.

हॉलीवुडचा संप नेमका कशासाठी?

स्क्रीन अॅक्टर्स गिल्ड (SAG- AFTRA) ए-लिस्ट स्टार्ससह 160,000 कलाकारांचे प्रतिनिधित्व करते. ते म्हणतात की त्यांच्या, मागणीनुसार वाटाघाटी कोणत्याही कराराशिवाय संपल्या आहेत.

कमी पगार आणि AI संबंधित धोका, पगार बंद होणे अशा अनेक कारणांमुळे लेखकांनी संप पुकारलाय. आता या संपात SAG- AFTRA सुद्धा सहभागी झालेय.

AI प्रवाहाचा उदय आणि कोरोनाव्हायरसमुळे उद्भवलेल्या आव्हानांमुळे स्टुडिओवर दबाव आला आहे, ज्यापैकी अनेकांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. तसेच अभिनेते आणि लेखक देखील वेगाने बदलत्या वातावरणात चांगले पगार आणि सुरक्षितता शोधत आहेत..

SS Rajamouli's RRR poster spotted during Hollywood actors writers SAG-AFTRA strike
R Madhavan on PM Modi: मोदींसोबत सेल्फी, एकत्र जेवण.. आर माधवनने केलं पंतप्रधानांचं कौतुक

संप थांबणार की चिघळणार?

थोडक्यात सांगायचे झाले तर... वॉल्ट डिस्ने कंपनी आणि नेटफ्लिक्स स्टुडिओचे प्रतिनिधित्व करणार्‍या अलायन्स ऑफ मोशन पिक्चर अँड टेलिव्हिजन प्रोड्युसर्सबरोबर कामगार युनियनचे नवीन लेबर अॅग्रीमेंट होऊ शकले नाही. त्यामुळे गुरुवारी मध्यरात्रीपासुनच लेखक - अभिनेते संपावर गेले आहेत.

सांगायचं झालं तर.. हॉलीवुडचे लेखक 11 आठवड्यांपासून संपावर आहेत. दूरचित्रवाणी आणि चित्रपटांमध्ये AI चा भविष्यातील वापराविरूद्ध चांगला पगार आणि संरक्षण मिळण्याच्या त्यांच्या सामान्य मागण्या पूर्ण न झाल्याने त्यांनी संप सुरू केला. आता हा संप मिटतो की चिघळतो, हे पुढच्या काही दिवसात स्पष्ट येतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.