Santosh Chordia: पुण्यातील रसिकांना खळखळून हसवणारे प्रसिद्ध कलाकार संतोष चोरडिया यांचं निधन

संतोष चोरडिया यांच्या निधनाने शोककळा पसरली आहे
stand up comedian artist santosh chordia passed away at the age of 57
stand up comedian artist santosh chordia passed away at the age of 57SAKAL
Updated on

Santosh Chordia Death News: प्रसिद्ध अभिनेते, स्टँड-अप कॉमेडियन आणि विनोदी कलाकार संतोष चोरडिया यांचं निधन झालंय. ते ५७ वर्षांचे होते. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला.

त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी ४ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. चोरडिया यांच्या पश्चात भाऊ, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

stand up comedian artist santosh chordia passed away at the age of 57
Ravindra Berde: रविंद्र - लक्ष्मीकांत यांच्या जोडीने या नाटकातून रंगभूमीवर अक्षरशः धुमाकूळ केला

गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी केवळ पुण्यातीलच नव्हे तर जगभरातील लोकांना आपल्या विनोदी अभिनयाने हसवले होते. अलीकडेच त्यांना विनोदोत्तम फाऊंडेशनतर्फे यंदाच्या 'विनोद वीर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गेल्या 40 वर्षांपासून ते थिएटर, टेलिव्हिजन आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. त्यांचे सामाजिक कार्यही मोठे होते.

अनेक कर्करोगग्रस्त, मूक, अनाथ, एचआयव्ही ग्रस्त लोकांसाठी ते सतत काम करत होते. त्यांना 'हास्यसम्राट' ही पदवी देण्यात आली.

‘दुसरी जोश’, 'कॅपुचीनो', 'दगडाबाईची चाळ', 'प्रेमा', 'सरगम' आदी चित्रपटांतून त्यांनी अभिनयाची झलक दाखवून सर्वांना खळखळून हसवले. केवळ भारतातच नाही तर लंडन, इस्रायल, ओमानमध्येही त्यांच्या अभिनयाचे चाहते आहेत. (Latest Marathi News)

भारतीय संगीत, नाटक, लोककला, शास्त्रीय नृत्य या ललित कलांच्या क्षेत्रात प्रवेश करू इच्छिणाऱ्या नवोदित कलाकारांना प्रोत्साहन आणि व्यासपीठ उपलब्ध करून देऊन चोरडिया यांनी २०२१ मध्ये ‘रंगकर्मी चोरडिया फाउंडेशन’ची स्थापना केली होती. त्यांनी त्याचे संस्थापक अध्यक्ष म्हणून काम केले. चोरडिया यांच्या निधनाने एक हरहुन्नरी कलाकार आपण गमावला म्हणून हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.