Video: शाहरुखच्या 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी धडपड : Bakri Eid

आपल्या आवडत्या अभिनेत्याची एक झलक पाहता यावी यासाठी त्याच्या मन्नत बंगल्याबाहेर संध्याकाळी तुफान गर्दी झाली होती.
Shah Rukh Khan Mannat
Shah Rukh Khan Mannat
Updated on

Bakri Eid 2023 : मुस्लिम धर्मियांकडून देशभरात आज बकरी ईद साजरी केली जात आहे. बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खाननं देखील आपल्या कुटुंबियांसोबत ईद साजरी केली. त्याचबरोबर चाहत्यांनी देखील या खास सणानिमित्त शाहरुखला शुभेच्छा दिल्या आहेत.

या शुभेच्छा देण्यासाठी आणि आपल्या आवडत्या अभिनेत्याची एक झलक पाहता यावी यासाठी त्याच्या मन्नत बंगल्याबाहेर संध्याकाळी तुफान गर्दी झाली होती. या गर्दीचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. (Stormy crowd of fans outside Shah Rukh Khan Bunglow Mannat to wish Bakri Eid Vido viral)

वांद्र्यातील बँडस्टॅड इथं शाहरुख खानचा मन्नत बंगला आहे. या बंगल्यासमोर असलेल्या रस्ता आज संध्याकाळी त्याच्या चाहत्यांच्या गर्दीनं अशरक्षः फुलून गेला होता. तशीही मुंबईत पर्यटनासाठी आलेल्या त्याच्या चाहत्यांची इथं कायमचं गर्दी असते पण आज खास ईद निमित्त या गर्दीनं उच्चांक गाठला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.