37 Years Of Karma: 'दिल दिया है जान भी देंगे ए वतन...' आता संस्कृतमध्ये! सुभाष घईंचा नवा प्रयोग!

८ ऑगस्ट १९८६ रोजी कर्मा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यातील दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे वतन तेरे लिये नावाचे गाणे तुफान लोकप्रिय झाले होते.
Subhash Ghai recreates hit karma song aye watan tere liye
Subhash Ghai recreates hit karma song aye watan tere liyeesakal
Updated on

Subhash Ghai recreates hit karma song aye watan tere liye : बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांच्या कर्मा या चित्रपटाची गोष्टच वेगळी आहे. या चित्रपटानं त्यांना वेगळी ओळख दिली. त्यांचे प्रथितयश दिग्दर्शक म्हणून सगळीकडे नावही झाले. मल्टिस्टारर कर्मानं बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली होती. या चित्रपटानं नुकतीच ३७ वर्ष पूर्ण केली आहेत.

८ ऑगस्ट १९८६ रोजी कर्मा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यातील दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे वतन तेरे लिये नावाचे गाणे तुफान लोकप्रिय झाले होते. इतक्या वर्षांनी देखील हे गाणे चाहत्यांची पसंतीचे आहे. त्याला मिळणारा प्रतिसादही मोठा आहे. कर्माचे दिग्दर्शक सुभाष घई हे आता या गाण्याचे संस्कृत व्हर्जन तयार करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं कर्मा मधील ते गाणे नेहमीच ऐकू येते. आजही त्यातील गोडवा आणि देशभक्ती खूप प्रेरणा देणारी ठरते. प्रसिद्ध गीतकार आनंद बक्षी यांचे शब्द असणाऱ्या या गाण्याला संगीतसाज लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे होते. आता त्याचे संस्कृत व्हर्जन हे मुंबईतील एका कार्यक्रमाच्या माध्यमातून समोर येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. कर्मा हा घई यांचा दुसरा चित्रपट होता. तर दिग्दर्शक म्हणून त्यांची ही नववी फिल्म होती.

कर्मामध्ये स्टारमंडळींची मोठी यादी होती. या चित्रपटाच्यावेळेस देशातील राजकीय परिस्थिती देखील खूपच वेगळी होती. त्याच दरम्यान देशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या करण्यात आली होती. राजीव गांधी यांनी नेतृत्व स्विकारले होते. त्यांच्या आग्रहास्तव अमिताभ बच्चन हे राजकारणात गेले. त्यांनी त्यावेळी फिल्म्समधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. यात घई यांच्या कर्मा चित्रपटाला प्रेक्षकांचा मिळालेला पाठींबा मोठा होता.

Subhash Ghai recreates hit karma song aye watan tere liye
Gadar 2 Vs OMG 2 Advance Booking : गदर 2 की OMG 2? सनी आणि अक्षयच्या शर्यतीचा प्रदर्शनापूर्वीच लागला निकाल!

कर्मामध्ये जॅकी श्रॉफ, अनिल कपूर, नसिरुद्दीन शहा, नुतन तसेच महानायक दिलीप कुमार या कलाकारांनी भूमिका केल्या होत्या. त्यावेळचा अनेक स्टार कलाकारांची मोठी संख्या असणारा हा सुपरहिट चित्रपट होता. घई यांच्या कर्मा चित्रपटाला प्रेक्षकांची अमाप लोकप्रियता मिळाली होती. या चित्रपटानं बॉक्सऑफिसवर देखील मोठी कमाई केली होती. घई यांच्या सर्वोत्तम चित्रपटांमध्ये कर्माचे नाव आवर्जून घेतले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.