Khalnayak 2 : प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई कमबॅकच्या तयारीत, 'खलनायक २' लवकरच येणार?

सुभाष घई हे नेहमीच त्यांच्या वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक आहेत.
Subhash Ghai all set to return to direction with blockbuster film Khal Nayak sequel
Subhash Ghai all set to return to direction with blockbuster film Khal Nayak sequel eakal
Updated on

Subhash Ghai all set to return to direction with blockbuster film Khal Nayak sequel : बॉलीवूडमधील काही चित्रपटांची क्रेझ ही बऱ्याच वर्षानंतरही कायम प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. ९० च्या दशकांतील काही चित्रपटांबाबत चाहते भलतेच इमोशनल असल्याचे दिसून येते. त्यावेळची गाणी, स्टोरी, डायलॉग आणि कलाकारांचा अभिनय यामुळे ते चित्रपट त्यांच्या नॉस्टेल्जियाचा भाग असतो हे वेगळं सांगण्याची गरज नाही.

प्रसिद्ध अभिनेता संजय दत्तचा खलनायक पाहिला नाही असा त्याचा चाहता सापडणे अवघड आहे. ९० च्या दशकांत या चित्रपटानं संजय दत्तला स्टार केलं. त्याच्या नावाचा मोठा चाहतावर्ग तयार झाला. संजय दत्त हे नावं अनेकांच्या तोंडी होतं. बॉलीवूडचे प्रख्यात दिग्दर्शक सुभाष घई यांनी दिग्दर्शित केलेल्या खलनायकमध्ये माधुरी दिक्षीत, जॅकी श्रॉफ, यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

Also Read - दिल्लीतल्या केवळ प्रशासकीय बदल्यांपुरतंच मर्यादित नाही, दिल्ली सेवा विधेयक. काय आहेत तरतुदी जाणून घ्या

सुभाष घई हे नेहमीच त्यांच्या वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक आहेत. त्यांनी आतापर्यत बॉलीवूडला अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. त्यात त्रिमूर्ती, यादे, खलनायक, सौदागर, राम लखन, कृष्णा या चित्रपटांचा उल्लेख करावा लागेल. यासगळ्यात सौदागर आणि खलनायकच्या अनेक आठवणी प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. आता खलनायक बाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

२०१४ नंतर सुभाष घी यांनी दिग्दर्शनातून ब्रेक घेतला होता. त्यानंतर आता ते नऊ वर्षांच्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा सक्रिय होणार असल्याची बातमी समोर आली आहे. ते आता खलनायक २ च्या तयारीत असल्याची चर्चा आहे. सुभाष घई पुन्हा खलनायक २ ची निर्मिती करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

घई यांच्या कर्मा, राम लखन, सौदागर सारख्या फिल्म्सकडे प्रेक्षकांनी नेहमीच आयकॉनिक मुव्हिज म्हणून पाहिले आहे. खलनायकच्या सिक्वेलविषयी बोलताना घई म्हणाले होते की, मला कित्येक स्टुडिओकडून ऑफर्स आल्या आहेत. मात्र त्या स्टुडिओची मानसिकता खूपच कमर्शियल आहे. ती फिल्म पुढील भागात आणखी चांगली कशी होईल याचा विचार आपण करत असल्याचे घई यांचे म्हणणे आहे.

Subhash Ghai all set to return to direction with blockbuster film Khal Nayak sequel
Ghoomer Review: एक हात नसला म्हणून काय झालं, मनात आणलं तर काहीही अशक्य नाही सांगणारा 'घूमर'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()