Subhedar Ajay Purakar News: मराठी मनोरंजन विश्वात विविध सिनेमे येत आहेत. यात विविध विषयांवरच समावेश आहे. अशातच मराठी सिनेसृष्टीत एक नवीन ऐतिहासिक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा म्हणजे सुभेदार.
सुभेदार सिनेमाची रिलीजआधीपासून सर्वांना उत्सुकता आहे. सुभेदार सिनेमात अजय पुरकर तान्हाजी मालुसरे यांची भूमिका साकारणार हे सर्वांना माहित होतं. आता सिनेमातील तान्हाजी मालुसरेंच्या व्यक्तिर्रेखेचा पहिला लूक रिव्हिल झालाय
(subhedar marathi movie ajay purkar tanhaji malusare first look reveal)
शिवाजी राजांचं अन् भगव्याचं रक्षन कराया आमी मराठे छातीचा कोट करून हुबं हाओत...हर हर महादेव !!! असं कॅप्शन देत सुभेदार सिनेमातील तान्हाजी मालुसरेंचा लूक रिव्हिल झालाय. तान्हाजी मालुसरे यांनी उदयभानाला चारीमुंड्या चित केलं होतं.
हाच मोठा पराक्रम आपल्याला सुभेदार सिनेमात पाहायला मिळणार आहे. अजय पुरकर यांचा रक्तबंबाळ चेहरा, आणि नजरेत असलेला अंगार अंगावर काटा आणत आहे.
“आधी लगीन कोंढाण्याच आन मग माझ्या रायबाच" म्हणत दंड थोपटून कोंढाण्यावर चढाई करत, अखेरच्या श्वासापर्यंत लढणाऱ्या सुभेदार नरवीर तान्हाजी मालुसरे हे शिवछत्रपतींच्या योद्ध्यांपैकी महत्त्वाचे नाव!
तान्हाजीरावांच्या नावाशिवाय शिवचरित्र पूर्णच होऊ शकत नाही. पण तान्हाजीराव म्हणजे केवळ सिंहगडाची लढाई नव्हे, तर छत्रपतींच्या स्वराज्याची पायाभरणी करणारे आघाडीचे शिलेदार होते.
‘सुभेदार‘ हे मुलकी आणि लष्करी दोन्ही प्रकारचे महत्त्वाचे पद... त्यांच्या अतुलनीय शौर्या बरोबरच त्यांच्या प्रशासकीय पैलूंवर प्रकाश टाकणारा भव्य ऐतिहासिक चित्रपट म्हणजे ‘सुभेदार’!
सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमाचा सुवर्ण इतिहास रुपेरी पडद्यावर मांडणाऱ्या ‘सुभेदार’ चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
‘पहिला मानाचा मुजरा’ असं म्हणत प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या टीझरमधून अतुल्य शौर्याची झलक पहायला मिळतेय.
लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टकातील पाचवे चित्रपुष्प असलेला ‘सुभेदार’ चित्रपट २५ ऑगस्ट २०२३ ला चित्रपटगृहांत झळकणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.