Subhedar Movie: तान्हाजी मालुसरेंच्या घरी ‘लगीनघाई! मराठमोळ्या वेशभूषेनं वेधलं लक्ष

Subhedar Movie:
Subhedar Movie:Esakal
Updated on

Subhedar Movie: गेल्या अनेक दिवसापासून ज्या चित्रपटाची सर्वजण आतुरतेने प्रतिक्षा करत होते अशा ‘सुभेदार’ चित्रपटाचा लुक आज समोर आला आहे.

हा चित्रपट नरवीर तानाजी मालुसरे यांच्या भावनिक आणि कौटुंबिक आयुष्य दाखवत त्यांचे शौर्य आणि पराक्रम आपल्यासमोर ठेवणार आहे. या चित्रपटाचे एक पोस्टर निर्मात्यांनी शेयर केले आहे.

या फोटोत मालुसरे कुटुंबात रायबाच्या लग्नाची सुरु असल्याचे दिसत आहे. दिग्पाल लांजेकर लिखित दिग्दर्शित ‘सुभेदार’ हा चित्रपट २५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

या फोटोत मालुसरे यांचं संपूर्ण कुटुंब पहायला मिळतंय. त्यात त्यांची आई, पत्नी, भाऊ, वहिनी, मुलगा आणि सदैव खंबीर साथ देणारे शेलारमामा दिसतात.

सुभेदारांची भूमिका अभिनेता अजय पूरकर तर त्यांच्या पत्नीची सावित्रीबाईंची भूमिका अभिनेत्री स्मिता शेवाळे यांनी साकारली आहे.

Subhedar Movie:
Kangana Ranaut : 'माझ्या इंग्रजी बोलण्यावरुन उडवली होती थट्टा, आज मी...'

सूर्याजी मालुसरेंच्या दमदार भूमिकेत अभिजीत श्वेतचंद्र, तर त्यांच्या पत्नी यशोदाबाईंची भूमिका शिवानी रांगोळे हिने साकारली आहे.

मालुसरे कुटुंबीयतील महत्वाचे सदस्य असलेल्या शेलारमामांच्या भूमिकेत समीर धर्माधिकारी दिसणार आहे.

तान्हाजीरावांच्या आईची भुमिका पार्वतीबाईंच्या भूमिकेत उमा सरदेशमुख आणि रायबाची भुमिका अर्णव पेंढारकर दिसत आहे.

Subhedar Movie:
Rocky Aur Rani Ki Prem Kahani: 'हा तर अपमान', 'रॉकी और राणी की प्रेम कहाणी' देखील वादाच्या भोवऱ्यात
Subhedar Movie:
Satyaprem Ki Katha BO: सत्यप्रेम की 'कथा' प्रेक्षकांना भलतीच आवडली! कमावले 'इतके' कोटी

ए.ए.फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंटची प्रस्तुत ‘सुभेदार’ चित्रपटाची निर्मिती राजवारसा प्रोडक्शन, मुळाक्षर प्रोडक्शन, पृथ्वीराज प्रोडक्शन, राजाऊ प्रोडक्शन, परंपरा प्रोडक्शन यांनी केली आहे.

प्रद्योत पेंढारकर, अनिल वरखडे, दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर, श्रमिक गोजमगुंडे, विनोद जावळकर, शिवभक्त अनिकेत जावळकर, श्रुती दौंड हे ‘सुभेदार’ चित्रपटाचे निर्माते आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.