Subhedar: 'सुभेदार' सुपरहिट झाला मात्र दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर प्रेक्षकांवर नाराज, हे आहे कारण

सुभेदार चे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर मात्र या कारणाने प्रेक्षकांवर नाराज झाले आहेत
subhedar marathi movie director digpal lanjekar request people to not shoot any scene in movie
subhedar marathi movie director digpal lanjekar request people to not shoot any scene in movieSAKAL
Updated on

सुभेदार सिनेमाची सर्वांना उत्सुकता होती. हा सिनेमा काल २५ ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज झाला. नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमावर आधारीत हा सिनेमा गेल्या काही महिन्यांपासुन चर्चेत होता. अखेर सुभेदार रिलीज झालाय.

सुभेदार सिनेमाला सुरुवातीपासुन प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. अनेक प्रेक्षकांना सिनेमा आवडतोय. सर्व काही चांगलं सुरु असताना सिनेमाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर मात्र प्रेक्षकांवर नाराज झाले आहेत.

(subhedar marathi movie director digpal lanjekar request people)

subhedar marathi movie director digpal lanjekar request people to not shoot any scene in movie
Subhedar Review: गनीमावर रोखल्या नजरा, तलवारी भिडल्या "सुभेदारा"चा महाराजांना मानाचा मुजरा!

दिग्पाल लांजेकर यांची प्रेक्षकांना हात जोडून विनंती

दिग्पाल लांंजेकर यांनी सुभेदार रिलीज झाल्यावर काही तासानंतर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओ शेअर करुन दिग्पाल लांजेकर म्हणतात, काही प्रेक्षक सुभेदार सिनेमा पाहून सिनेमाच्या क्लायमॅक्सचा काही भाग मोबाईलवर शूट करुन अपलोड करत आहेत.

मी तुमच्या भावनांचा आदर करतो. पण कृपया असं करु नक. ज्यामुळे सिनेमा पाहणाऱ्या इतर प्रेक्षकांचा रसभंग होईल. त्यामुळे सिनेमाचा क्लायमॅक्स किंवा इतर कोणताही भाग शूट करु नये, अशी विनंती दिग्पाल लांजेकर यांनी केलीय.

सुभेदार सिनेमाची पहिल्याच दिवशी बक्कळ कमाई

25 ऑगस्टला सर्वत्र हा सिनेमा रिलिज झाला. राज्यातील जवळपास 350हून अधिक चित्रपटगृहांत या सिनेमांचे 900 पेक्षा जास्त शोज दाखवण्यात आले.

त्याचबरोबर भारतासह इतर सहा देशांत 'सुभेदार' प्रदर्शित झाला करण्यात आला आता या सिनेमाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे चित्रपटाच्या कमाईच्या आकड्यावरुन कळेलच. या सिनेमाने पहिल्या पहिल्याच बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.

Sacnilkच्या सुरुवातीच्या आकडेवारीनुसार या सिनेमानं पहिल्या दिवशी 1.2 कोटींची कमाई केली आहे.

एकीकडे बॉलिवूडमध्ये 'ड्रीम गर्ल 2', 'गदर 2' आणि 'OMG 2' हे चित्रपट प्रदर्शित झाले आहे आता त्याच्या तुलनेत 'सुभेदार' चित्रपटाच्या कलेक्शनचे समोर आलेले हे आकडे समाधान कारक आहेत. तर विकेंडला हा 'सुभेदार'च्या कमाईत वाढ होऊ शकते.

सुभेदारचा रिलीजआधीच रेकॉर्ड

सुभेदार चित्रपटातील कलाकारांबद्दल बोलायचं झालं तर सिनेमात मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पूरकर, समीर धर्माधिकारी, अभिजित श्वेतचंद्र, स्मिता शेवाळे, उमा सरदेशमुख, अलका कुबल, ज्येष्ठ दिग्दर्शक मा. राजदत्त, दिग्पाल लांजेकर, अजिंक्य ननावरे, ऋषी सक्सेना, नूपुर दैठणकर, मृण्मयी देशपांडे, आस्ताद काळे, शिवानी रांगोळे, विराजस कुलकर्णी, अर्णव पेंढरकर आदी मराठीतल्या दिग्गज कलाकारांच्या भूमिका आहेत.

तर दुसरीकडे "प्रदर्शनाआधीच बुक माय शो वर 40K+ इंटरेस्टेड लाईक्स मिळालेला पहिला मराठी चित्रपट 'सुभेदार' !" हा पहिला मराठी सिनेमा ठरलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.