Ravindra Mahajani Death: माझा पहिला सिनेमा तुमच्यासोबत.. रविंद्र महाजनींच्या निधनाने सुबोध भावे भावुक

सुबोध भावेने रविंद्र महाजनी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय.
subodh bhave emotional post on ravindra mahajani death
subodh bhave emotional post on ravindra mahajani deathSAKAL
Updated on

Ravindra Mahajani Death Subodh Bhave Post News: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचे आज वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले आहे.

पुण्यातील एका बंद खोलीत शुक्रवारी सायंकाळी रात्री उशिरा त्यांचा मृतदेह आढळल्याने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. आता सुबोध भावेने रविंद्र महाजनी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय.

(subodh bhave post on ravindra mahajani death)

subodh bhave emotional post on ravindra mahajani death
Prajakta Mali: प्राजक्ताने भलंमोठं कर्ज काढून घेतलं 'या' ठिकाणी घर, आलिशान घराची झलक बघा

सुबोध भावेने रविंद्र महाजनींचा फोटो पोस्ट करुन लिहीलंय की.. मराठी चित्रपटातील माझं व्यावसायिक अभिनेता म्हणून पहिलं पाऊल रविंद्र महाजनी यांनी निर्मिती आणि दिग्दर्शन केलेल्या " सत्तेसाठी काहीही " या चित्रपटातून पडले.


अतिशय रूबाबदार, विलक्षण देखणे, खऱ्या अर्थाने मराठी मधील handsome नायक , कायम हसतमुख अशीच तुमची प्रतिमा कायम मनात कोरली गेली आहे. दादा तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली. अशी पोस्ट सुबोध भावेने केलीय.

subodh bhave emotional post on ravindra mahajani death
Rakhi Sawant to Modi: आतातरी मुंबईतले खड्डे... चांद्रयान 3 नंतर राखी सावंतची नरेंद्र मोदींना विनंती

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक

"आपल्या सर्वांगसुंदर अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचे दुर्दैवी निधन झाले आहे.

परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करो तसेच महाजनी परिवारास या दुःखातून सावरण्यासाठी बळ देवो हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली." असं ट्वीट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

कुठे घडली घटना?

पुण्यातील तळेगाव दाभाडे येथील एक्सरबीया सोसायटी, MIDC रोड, आंबी येथे भाड्याच्या घरात महाजनी राहत होते. त्यांचा मृतदेह येथील बंद फ्लॅटमध्ये मिळून आला आहे.

ते गेले ७-८ महिन्यांपासून या ठिकाणी एकटेच राहत होते. दरम्यान दोन ते तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.