Subodh Bhave : संत तुकारामांच्या भूमिकेत सुबोध भावे! फोटो शेयर करताच...

यासगळ्यात सुबोधच्या एका पोस्टनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यानं येत्या काळात आपण कोणत्या भूमिकेत दिसणार आहोत, याविषयी सांगितलं आहे.
Subodh Bhave
Subodh Bhave esakal
Updated on

मराठीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे हा त्याच्या वेगवेगळ्या भूमिकांसाठी ओळखला जाणारा कलाकार आहे. खरं तर तो नेहमीच चरित्र भूमिकांसाठी प्रेक्षकांची पसंती मिळवताना दिसला आहे. यापूर्वी त्यानं बालगंधर्व, लोकमान्य टिळक, काशिनाथ घाणेकर, छत्रपती शिवाजी महाराज अशा विविध भूमिका साकारल्या आहेत.

यासगळ्यात सुबोधच्या एका पोस्टनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यानं येत्या काळात आपण कोणत्या भूमिकेत दिसणार आहोत, याविषयी सांगितलं आहे. सुबोध हा जगद्गगुरु संत तुकाराम यांच्या भूमिका साकारताना दिसणार आहे. सुबोधनं तो फोटो शेयर करताच त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव सुरु झाला आहे. कित्येक चाहत्यांनी त्याच्या आगामी प्रोजेक्टसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

सुबोधनं फेसबूकवरुन एक खास पोस्ट शेयर करताना म्हटले आहे की, आज "संत तुकाराम" या आमच्या आगामी हिंदी चित्रपटातील "तुकाराम महाराज" यांच्या वेशातील माझं पहिलं छायाचित्र तुमच्या समोर सादर करत आहे. ही अद्वितीय व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मला दिल्याबद्दल माझ्या दिग्दर्शकांचे मी आभार मानतो.

Subodh Bhave
RRR Oscar 2023 : एकदा का होईना 'ब्रॅड पिट' सोबत काम करायचंय! ऑस्कर विजेता एनटीआर असं का म्हणाला?

याशिवाय सुबोधनं म्हटलं आहे की, तुकाराम महाराज साकार करण्यामागे एक फार छान गोष्ट आहे. ती यथावकाश कथन करीन. सध्या माझे निर्माते आणि संपूर्ण संघाचे मनपूर्वक आभार, आता कोठे धावे मन,तुझे चरण देखीलिया! असे म्हणत सुबोधनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()