किंग खान शाहरुख हा सध्या त्याच्या आगामी प्रोजेक्टबद्दल चर्चेत आहे. त्याच्या पठाण, जवाननंतर डंकीचे वेध प्रेक्षकांना लागले आहेत. अशातच शाहरुखची लेक सुहाना खान ही लाईमलाईटमध्ये आली आहे. ती द आर्चीज मधून बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार असून त्या चित्रपटाचे दिग्दर्शन झोया अख्तरनं केले आहे.
सुहाना तिच्या द आर्चीजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याचवेळी ती वेगवेगळ्या कारणामुळे ट्रोल झाल्याच दिसून येत आहे. नेटकऱ्यांनी तिला धारेवर धरले आहे. ७ डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर तो चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्याची शाहरुख आणि सुहानाच्या चाहत्यांना कमालीची उत्सुकता आहे. त्याचा काही दिवसांपूर्वी ट्रेलरही प्रदर्शित झाला होता. त्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे. त्याला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसत आहे. चित्रपटातील गाणीही ट्रेडिंगचा विषय आहे.
Life Balance जाणून घ्या हा 'वेक अप काॅल' आणि बना सर्वार्थाने समृद्ध
द आर्चीजची संपूर्ण स्टारकास्ट प्रमोशनच्या निमित्तानं वेगवेगळ्या शहरांच्या दोऱ्यावर आहे. एका इव्हेंटमध्ये सुहानानं जे काही केलं त्यामुळे ती ट्रोल झाली आहे. सोशल मीडियावर तिची तुलना राखी सावंतशी होताना दिसत आहे. सुहानानं हुला हूपची स्टेप करुन उपस्थित प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. मात्र त्यामुळे तिला ट्रोल व्हावे लागले आहे.
सुहानाचा तो व्हिडिओ पाहिल्यानंतर एका नेटकऱ्यानं तिला कमेंट केली आहे की, स्टारकिड्स हे मीडियासमोर स्वताचे हसू का करुन घेतात हे कळत नाही. शाहरुखची लेक आहे त्यामुळे तुम्ही काहीही करायचं का, आणि नेटकऱ्यांनी त्याचं कौतुक करायचं असं कसं चालेल, दुसऱ्यानं म्हटलं आहे की, तिच्यापेक्षा राखी सावंतनं चांगली हुक स्टेप केली असती. अशा शब्दांत नेटकऱ्यांनी तिला सुनावले आहे.
द आर्चीजमध्ये सुहानासोबत अगस्त्य नंदा, खुशी कपूर, वेदांग मेहरा, मिहीर अहुजा, युवराज मेंडा आणि आदिती डॅट यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट १९६० च्या एका कथेवर आधारित असून त्यात सुहानानं वेरोनिकाची भूमिका केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.