CM Eknath Shinde: "मुख्यमंत्र्यांच्या पत्नी माझ्या मोठ्या फॅन", वर्षा बंगल्यावर गेलेल्या सुकन्या मोनेंचा विलक्षण अनुभव

सुकन्या मोने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरी गणपती दर्शनाला गेल्या होत्या
sukanya mone visit cm eknath shinde family ganpati darshan at varsha bunglow
sukanya mone visit cm eknath shinde family ganpati darshan at varsha bunglow SAKAL
Updated on

सध्या सगळीकडे गणेशोत्सवाचं उत्साहाचं वातावरण आहे. गणेशोत्सवात सगळीकडे आनंदी आणि एक प्रकारची सकारात्मक उर्जा बघायला मिळते. यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरी बॉलिवूड कलाकारांना बोलावणं झालंच. शिवाय काल २७ सप्टेंबरला मराठी कलाकार सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या घरी बाप्पाच्या दर्शनाला गेले होते.

सर्व मराठी कलाकारांमध्ये अभिनेत्री सुकन्या मोने सुद्धा होत्या. सुकन्या मोनेंनी सोशल मिडीयावर त्यांना आलेला वर्षा बंगल्यावरचा अनुभव सांगितला आहे.

sukanya mone visit cm eknath shinde family ganpati darshan at varsha bunglow
Hemangi Kavi: "लाज वाटली आणि वाईटही वाटलं", हेमांगी कवीने सांगितला मुख्यमंत्री शिंदेंच्या गणपती दर्शनाचा अनुभव

मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सुकन्या मोनेंच्या फॅन्स

सुकन्या मोने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो पोस्ट करुन त्यांच्या भावना व्यक्त केल्यात. सुकन्या मोने लिहीतात, "मा.मुख्यमंत्री श्री.एकनाथराव शिंदे, यावर्षी आपल्या श्री गणपती दर्शनाला मला आवर्जून निमंत्रित केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! आपण आणि आपल्या कुटुंबाने आम्हा सगळ्या कलाकार मंडळींकडे जातीने लक्ष दिलेत त्याबद्दल आभार. आपल्या सौ. नी त्या माझ्या पूर्वीपासून fan आहेत हे सांगून मला सुखावले. पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार! गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!"

निर्माता - अभिनेता मंगेश देसाईंनी घेतला पुढाकार

धर्मवीर सिनेमाचे निर्माते आणि अभिनेते मंगेश देसाई यांनी पुढाकार घेऊन सर्व मराठी कलाकारांना मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर एकत्र आणले.

यावेळी विशाखा सुभेदार, अमृता खानविलकर, स्पृहा जोशी, नम्रता संभेराव, जयवंत वाडकर, श्रृती मराठे, गौरव घाटणेकर, दीपाली सय्यद, ओंकार भोजने, सुकन्या मोने, रसिका वेंगुर्लेकर, सचिने गोस्वामी असे अनेक कलाकार यावेळी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()