Jacqueline Fernandez : अखेर सुकेशसोबतच्या अफेअरवर जॅकलीन बोलली; म्हणाली, तो जयललितांचा...

Jacqueline Fernandez 
 money laundering case
Jacqueline Fernandez money laundering caseEsakal
Updated on

नवी दिल्ली - सुकेश चंद्रशेखर यांच्याशी संबंधित २०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने बुधवारी दिल्लीच्या एका न्यायालयात प्रथमच आपली चूक मान्य केली. तसेच सुकेशने आपल्या भावनांशी खेळ करत माझं जीवन नरक बनवल्याचं तिनं म्हटलं. (Jacqueline Fernandez news in Marathi)

Jacqueline Fernandez 
 money laundering case
Accident News : कोकणात आणखी एक भीषण अपघात; 4 जणांचा जागीच मृत्यू

पटियाला हाऊस कोर्टात सुरू असलेल्या या खटल्यात अभिनेत्रीने दावा केला की, सुकेशची सहकारी पिंकी इराणीने स्वत:ला 'सरकारी अधिकारी' असल्याचे भासवून तिला कारमधून फिरायला नेले. जॅकलिनच्या वक्तव्यानुसार सुकेशने स्वत:ची ओळख सन टीव्हीची मालक म्हणून करून दिली होती. तसेच त्याने दावा केला होता की (तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री) जयललिता त्यांच्या मावशी होत्या.

Jacqueline Fernandez 
 money laundering case
PM Modi Visit Mumbai: मुंबईच्या वाहतुक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या मार्ग

सुकेशने मला सांगितले की तो त्याचा खूप मोठा चाहता आहे. मी दक्षिण भारतातही चित्रपट केले पाहिजेत. सन टीव्हीचा मालक म्हणून त्याच्याकडे अनेक प्रोजेक्ट्स आहेत. 'सुकेशने माझी दिशाभूल केली, माझं करिअर आणि माझी उपजीविका उद्ध्वस्त केली. तसेच त्याला गृह विभागाचा अधिकारी असल्याचं भासवल्याप्रकरणी सुकेशला अटक करण्यात आल्याचं आपल्याला नंतर कळलं होतं, असंही जॅकलिनने नमूद केलं.

Jacqueline Fernandez 
 money laundering case
Bribe Case : पुणे विद्यापीठात क्लर्कने मागितली ५०० रुपये लाच; तक्रारीसाठी खर्च ४०० रुपये

जॅकलिनने दावा केला की जेव्हा तिला सुकेशच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबद्दल सांगितले गेले तेव्हा तिला त्याचे खरे नाव कळले. पिंकी इराणीने आपली फसवणूक केल्याचे अभिनेत्रीने म्हटले आहे. सुकेशची पार्श्वभूमी तिने कधीच उघड केली नाही. वास्तविक पाहता, 'पिंकी इराणीला चंद्रशेखर यांच्या कारनाम्यांची माहिती होती, असंही जॅकलिन म्हणाली. आता या प्रकरणाची सुनावणी येत्या २५ जानेवारी रोजी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.