सुखविंदर सिंहांनी अयोध्येत लाँच केला 'हनुमान चालिसा' म्युझिक व्हिडिओ

Sukhwinder Singh
Sukhwinder Singhesakal
Updated on
Summary

सुखविंदर सिंह यांनी ‘बजरंगबली’ भक्तांना एक खास भेट दिलीय.

उत्तर प्रदेशातील अयोध्येत (Ayodhya) बॉलिवूडचे सुप्रसिद्ध गायक आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुखविंदर सिंह (Sukhwinder Singh) यांनी ‘बजरंगबली’ भक्तांना एक खास भेट दिलीय. सुखविंदर सिंह यांनी आपल्या आवाजातील ‘श्री हनुमान चालिसा’ (Hanuman Chalisa) लाँच केलीय. अयोध्येला जाऊन प्रभू श्रीराम यांच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर सुखविंदर सिंह यांनी Time Audio आणि Raj VFX निर्मित त्यांच्या संगीत व्हिडिओचं अनावरण केलंय.

90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये दिल से चित्रपटातील छैयाछैया हे सुपरहिट गाणं गाऊन प्रसिद्धी मिळवणारे सुखविंदर सिंह काल सायंकाळी उशिरा अयोध्येला पोहोचले. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन रामभक्तांना मोठी भेट दिलीय. आपल्या आवाजातील हनुमान चालिसा प्रेक्षकांच्या भेटीला आणताना खूप आनंद होत असल्याचं ते म्हणाले. सुखविंदर सिंह म्हणाले, 'मी नेहमीच भगवान श्री हनुमानजींचा भक्त राहिलोय. या शक्तीमंत्राला माझा आवाज द्यावा अशी इच्छा होतीच, भगवान हनुमानजींच्या कृपेनं माझं स्वप्न पूर्ण झालंय. टाईम ऑडिओनं गाण्यासाठी आपल्या प्रकारचा पहिला लाईव्ह अॅक्शन+अॅनिमेशन आधारित म्युझिक व्हिडिओ तयार करून गाणं एका वेगळ्याच उंचीवर नेलंय. आता रामजन्मभूमी मंदिरात श्रीरामजींचं आशीर्वाद प्राप्त करणं हा सर्वात मोठा आशीर्वाद आहे, असंही ते म्हणाले.

Sukhwinder Singh
माझ्या विजयाचं खरं श्रेय 'या' लोकांना देणार : जयश्री जाधव

बजरंगबलीच्या प्रत्येक भक्तानं हे गाणे माझ्यासोबत गावं, अशी माझी इच्छा असल्याचं त्यांनी सांगितलं. या गाण्याचं VFX आणि त्याची रचना चिराग चंद्रकांत भुवा आणि शंभू जे सिंग यांनी केलीय. त्याचबरोबर या गाण्याचे दिग्दर्शक राजीव खंडेवाल आहेत. कोरिओग्राफर लॉलीपॉप आहेत, डीओपी संतोष दामोदर देटके आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.