ekada kay zala : मराठी सह हिंदी मनोरंजन विश्वात आपल्या अभिनयाची जादू दाखवणारा अभिनेता सुमीत राघवन लवकरच एका मराठी चित्रपटात झळकणार आहे. मध्यंतरी तो 'हॅम्लेट' आणि 'एक शून्य तीन' या नाटकांमधून झळकला होता, पण बऱ्याच दिवसात त्याने मराठी मालिका किंवा चित्रपट केला नसल्याने प्रेक्षक या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर त्याने एका दमदार चित्रपटाची घोषणा केली आहे. 'एकदा काय झालं' हा त्याचा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. (sumeet raghvan new marathi movie ekda kay zala release soon directed by dr. saleel kulkarni)
सुमीत सध्या ‘वागले की दुनिया’ या सब टीव्हीवरील हिंदी मालिकेत मुख्य भूमिकेत दिसत आहे. तो सोशल मिडियावरही खूप सक्रिय असतो. सध्याच्या राजकीय घडामोडीवरही त्याने ट्विट करत आपले विचार मांडले. आता मात्र तो रसिकांच्या मनोरंजनासाठी एक भन्नाट चित्रपट घेऊन आला आहे. त्याने सोशल मिडियावर एक पोस्ट शेयर करत चित्रपटाचे नाव आणि रिलीजची तारीख जाहीर केली. अत्यंत दिग्गज कलाकार या चित्रपटात असणार आहेत. (Sumeet Raghvan new marathi movie) (dr. saleel kulkarni new marathi movie)
प्रसिद्ध गायक आणि संगीतकार सलील कुलकर्णी (Saleel Kulkarni) या चित्रपटाचे (Ekada Kay Zala) लेखक आणि दिग्दर्शक आहेत. सलील बऱ्याच दिवसांनी एका सुंदर कलाकृतीसह समोर येत असून लेखन, दिग्दर्शन, संगीत अशी तिहेरी भूमिका ते सांभाळताना दिसणार आहेत. चित्रपटाचा एक टीझर नुकताच प्रदर्शित झाला. ज्यामध्ये लहान मुलांच्या गोष्टींची पुस्तकं दिसत आहेत आणि सुमीत एका लहान मुलासोबत आहे. ‘एका गोष्टी सांगणाऱ्या माणसाची अनोखी गोष्ट....’ असे कॅप्शन या पोस्टला देण्यात आले आहे.
या टीजरमध्ये ‘लहानपणी ऐकलेल्या गोष्टी आयुष्यभर साथ देतात’ असं एक वाक्य आहे. या चित्रपटातून लहान मुलांचं भावविश्व उलगणार असं दिसतंय. शिवाय सलील कुलकर्णी यांचे संगीत असल्याने हा चित्रपट एक वेगळीच पर्वणी असणार आहे. या चित्रपटात सुमीत राघवन, (Urmila Kothare) उर्मिला कोठारे, मोहन आगाशे, सुहास जोशी, (Pushkar Shrotri) पुष्कर श्रोत्री आणि एका गोंडस बालकलाकाराच्या रूपात चिमुकला अर्जुन पूर्णपात्रे सुद्धा दिसणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.