सुनील शेट्टी हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आहे, सुनील शेट्टीला कोणत्याही परिचयाची गरज नाही. ९० च्या दशकात सुनील शेट्टीचे नाव निवडक कलाकारांमध्ये घेतले जाते, ज्यांचा अभिनय आणि लूक मुलींना वेड लावत होते. अभिनेत्याने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात लग्न केले असले तरी, त्याची फीमेल फॅन फॉलोइंग मजबूत राहिली आहे.
सुनील शेट्टीने माना शेट्टीसोबत लव्ह मॅरिज केले होते. दोघांना दोन मुले आहेत, जी अनेकदा प्रसिद्धीच्या झोतात राहतात. सुनील शेट्टी आणि माना शेट्टी यांची लव्हस्टोरी खूप रंजक आहे. दोघांनाही एकमेकांची साथ मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. दोघांकडे पळून जाऊन लग्न करण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता. मात्र, सुनील आणि मनाला हे नको होते.
सुनील शेट्टीने माना शेट्टीला पहिल्यांदा मुंबईतील नेपियन सी रोडवरील पेस्ट्रीच्या दुकानात पाहिले, जिथे तो अनेकदा संध्याकाळी त्याच्या मित्रांना भेटायला जायचा. अभिनेता पहिल्या नजरेतच मानाच्या प्रेमात पडल्याचं म्हटलं जातं. मात्र, मानाशी मैत्री कशी करावी हे समजत नव्हते. त्यामुळे प्रत्येक मुलगा त्या वयात जे करतो ते त्याने केले. त्याने प्रथम मानाच्या बहिणीशी मैत्री केली, जेणेकरून तीही त्याला भेटू शकेल.
काही भेटीनंतर सुनील शेट्टीच्या लक्षात आले की माना ही ती मुलगी आहे जिच्यासोबत त्याला आयुष्य घालवायचे आहे. यानंतर सुनील शेट्टीने त्याच्या एका मित्राला पार्टी आयोजित करण्यास सांगितले आणि मानालाही तेथे आमंत्रित केले. या पार्टीनंतर सुनील मानाला बाईक राईडवर घेऊन गेला, या बाईक राईड दरम्यान दोघांनाही समजले की ते एकमेकांवर प्रेम करतात.
कालांतराने सुनील शेट्टी आणि माना शेट्टीचे नाते अधिक घट्ट होत गेले. अशा परिस्थितीत दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. याबाबत पालकांना सांगितले असता त्यांनी नकार दिला. मानाचे वडील गुजराती मुस्लिम आणि आई पंजाबी आहे. तर सुनील शेट्टी हे कर्नाटकातील तुळू भाषिक कुटुंबातील आहेत. अशा परिस्थितीत संस्कृती, धर्म आणि जात या दोघांच्या नात्यात अडथळे बनून उभे राहिले.
दोघांच्या कुटुंबीयांनी या नात्याला साफ नकार दिला होता. मात्र, सुनील शेट्टी आणि माना यांनी या काळात हार मानली नाही आणि कुटुंबीयांची मनधरणी सुरूच ठेवली, तरीही त्यांचे कुटुंबीय या नात्यासाठी तयार नव्हते. अशावेळी पळून जाऊन लग्न करण्याशिवाय त्याच्यापुढे पर्यायच उरला नव्हता. मात्र, त्यांना हे नको होते. घरच्यांच्या संमतीशिवाय लग्न करणार नाही, असा निर्णय त्यांनी घेतला. म्हणून त्यांनी वाट पाहण्याचा निर्णय घेतला.
सुरुवातीला घरच्यांनी सुनील शेट्टी आणि मानाच्या नात्याला नकार दिला होता. मात्र, कालांतराने दोघांचे बॉन्डिंग पाहून कुटुंबीयांनी नंतर होकार दिला. सुनील शेट्टी आणि माना यांना 9 वर्षे वाट पाहावी लागली. सुनील शेट्टी आणि माना 9 वर्षानंतर 25 डिसेंबर 1991 रोजी लग्नाच्या बंधनात अडकले. खऱ्या आयुष्यात सुनील शेट्टी त्याच्या पर्सनल लाईफपेक्षा त्याच्या प्रोफेशनल लाईफमुळे जास्त चर्चेत आहे. हा अभिनेता फॅमिली मॅन असल्याचे म्हटले जाते. खऱ्या आयुष्यात त्याला कुटुंबासोबत वेळ घालवायला आवडते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.