Suniel Shetty Angry on bollywood movies trolled why : बॉलीवूडचा अण्णा म्हणून लोकप्रिय असणाऱ्या सुनील शेट्टीनं एका मुलाखतीमध्ये बॉलीवूड आणि बॉलीवूडचे चित्रपट यावर सडकून टीका केली आहे. त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. नेटकऱ्यांनी देखील त्याच्या बोलण्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका मुलाखतीमध्ये सुनील शेट्टीनं सध्याच्या बॉलीवूडच्या चित्रपटांविषयी परखडपणे मत व्यक्त केले होते. तो म्हणाला, बॉलीवूडला आता अर्थशास्त्र समजून घेण्याची वेळ आहे. कोणते चित्रपट चालतात, कोणते चालत नाही, त्यांची कथा, अभिनेते, गाणी हे सारं खूप महत्वाचे आहे. आपले चित्रपट चालत नाही आणि दुसऱ्या भाषेतील चालतात यामागे काहीतरी कारण असेल. त्याचा शोध घेण्याची गरज आहे.
Also Read - सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'
सुनील शेट्टीनं सद्यस्थितीतील बॉलीवूड काय करते याविषयी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. तो म्हणाला, लोकं कचरा पाहण्यासाठी येत नाही. त्यांना एखादी गोष्ट आवडत असेल तर तो चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये जाणारच. तुम्ही क्रिएटिव्हीटीच्या नावाखाली प्रेक्षकांची फसवणूक करु शकत नाही.
मेकर्स चित्रपट तयार करताना बजेट वाढवत नाहीत. त्यांना अभिनेत्यांवर पैसे खर्च करायचा नसतो. त्यामुळे एखादी चांगली कलाकृती कशी काय तयार होईल हा माझा प्रश्न आहे. ९० चे दशक आणि आताचे यात खूप सारा फरक आहे. तो आपण समजून घ्यायला पाहिजे. लोकांना काय आवडेल ते द्या. तुम्हाला काय आवडते याला अर्थ नाही.
यावेळी सुनील शेट्टीनं सांगितलं की, त्याचा पहिला चित्रपट आरजू बंद पडला होता. मात्र तो काही खचला नाही. अॅक्शन स्टंट करण्यात आपली बाजू चांगली असल्यानं लगेच दुसरा चित्रपट मिळाला. मी बरेच चित्रपट त्यानंतर साईन केले होते. आता जर असे झाले असते तर सोशल मीडियावर मला लोकांनी हैराण केले असते. सुनील शेट्टी हा काही दिवसांपूर्वी धारावी बँक नावाच्या मालिकेमध्ये दिसला होता.
सुनील शेट्टीच्या धारावी बँक मालिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. त्यामध्ये विवेक ऑबेरॉय, सोनाली कुलकर्णीनं महत्वाची भूमिका साकारली आहे. त्यामध्ये धारावी परिसरातील वास्तव आणि त्याच्याशी संबंधित असलेलं राजकारण यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यानंतर सुनील शेट्टी हा हेरा फेरी तीनमध्ये देखील दिसणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.