सुनील दत्त यांचे मृत्यूपूर्वी परेश रावल यांना पत्र...

अभिनेता संजय दत्त यांच्या जीवनावर आधारित चित्रपट 'संजू' मध्ये परेश यांनी सुनिल यांची भूमिका साकारली होती.
sunil dutt,paresh rawal
sunil dutt,paresh rawalfile image
Updated on

मुंबई - बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते सुनिल दत्त((sunil dutt) यांचे 25 मे 2005 रोजी निधन झाले. निधनाच्या काही तासांपूर्वी सुनिल दत्त यांनी अभिनेते परेश रावल (paresh rawal) यांना पत्र लिहिले होते. त्यादिवशी परेश रावल यांचा वाढदिवस होता. नुकतीच एका मुलाखतीमध्ये परेश यांनी सुनिल दत्त यांची ही आठवण सांगितली आहे. अभिनेता संजय दत्तच्या जीवनावर आधारित चित्रपट 'संजू' मध्ये परेश यांनी सुनिल यांची भूमिका साकारली होती.(sunil dutt wrote later to paresh rawal hours before his death)

परेश रावल यांनी मुलाखतीमध्ये सांगितले, 'सुनील दत्त यांच्या निधनाबद्दल ज्यावेळी मला कळलं, त्याच क्षणी मी माझी पत्नी स्वरूप संपतला फोन केला आणि घरी उशिरा येणार असं सांगितलं. त्यावेळी माझी पत्नी स्वरूप संपतने मला सांगितलं की, सुनील दत्त यांनी माझ्यासाठी एक पत्र पाठवलंय. माझ्या वाढदिवसासाठी त्यांनी हे पत्र लिहिलं असल्याचं तिने सांगितलं. माझा वाढदिवस ३० मे रोजी म्हणजेच घटनेच्या पाच दिवसानंतर होता. त्यानंतर पत्नी स्वरूप संपतने मला ते पत्र वाचून दाखवलं. सुनील दत्त यांनी माझ्या वाढदिवसाच्या पाच दिवस अगोदरच मला हे पत्र पाठवलं याचं मला खूप आश्चर्य वाटलं. आम्ही कधीच एकमेकांना पत्र लिहिलं नव्हते'

sunil dutt wrote later to paresh rawal hours before his death
sunil dutt wrote later to paresh rawal hours before his deathfile image
sunil dutt,paresh rawal
डान्स इंडिया डान्सचा स्पर्धक बिकी दासचा अपघात

या पत्रामध्ये सुनिल दत्त यांनी लिहिले होते, 'प्रिय परेश जी. ३० मे रोजी तुमचा वाढदिवस असतो. तुमच्या जीवनात कायम सुख, समृद्धी आणि सौभाग्य लाभो अशी प्रार्थना करतो. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबावर देवाचा नेहमीच आशिर्वाद राहू देत'. सुनिल दत्त यांनी मदर इंडिया, मुझे जिने दो, खानदान, मेरा साया आणि पडोसन या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

sunil dutt,paresh rawal
Video: 'सरसेनापती हंबीरराव' मधील महाराजांचे सिंहासनाधिश्वर दर्शन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.