Sunny Deol Gadar 2 : 'सूनबाईचा पायगुण दुसरं काय?' तारा सिंगनं 'गदर २' च्या यशाचं श्रेय दिलं सूनेला

नुकतच गदर २ च्या चित्रपटानं भव्य यशानिमित्तानं एका पार्टीचे आयोजन केले होते. त्यात दिग्दर्शक शर्मा यांनी तिसऱ्या भागाचे संकेत दिले होते.
Sunny Deol Gadar 2
Sunny Deol Gadar 2 esakal
Updated on

Sunny Deol Credit to Daughter in law Risha Acharya : अनिल शर्मा दिग्दर्शित गदर २ चित्रपटानं आता खरोखर कहर केला आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं प्रचंड धुमाकूळ घातला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर त्याची चर्चा सुरु आहे. तब्बल २२ वर्षांपासून प्रेक्षक या चित्रपटाची वाट पाहत होते. तारा सिंगनं प्रेक्षकांना जिंकून घेतले आहे.

सनीच्या गदर २ ची दोनशे कोटीकडे वाटचाल सुरु झाली आहे. त्याच्या आसपास केवळ रजनीकांतचा जेलर हा चित्रपट आहे. टॉलीवूडच्या सुपरस्टारला पहिल्यांदा कुणी एवढी मोठी फाईट दिली असेल. यापूर्वी रजनीकांतचा एखादा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर कोणताही अभिनेता चित्रपट प्रदर्शित करण्याचा विचार करत नसे. आता मात्र सनीनं थेट रजनीशी पंगा घेतल्याचे दिसून आले आहे.

Also Read : Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

रजनीच्या जेलरला दाक्षिणात्य चित्रपट गृहांमध्ये मोठा प्रतिसाद मिळाला आहे. तो मिळणे साहजिकच आहे. तिकडे रजनीचा प्रदर्शित होणारा प्रत्येक नवा चित्रपट हा एखादा सण साजरा करण्यासारखे आहे. त्यामुळे तिथे रजनीचा चित्रपट आल्यानंतर बऱ्याचशा खासगी कार्यालयांमध्ये सुट्टीही जाहीर केली जाते. असा उत्सवी माहौल रजनीच्या मुव्हीच्या वेळी दिसून येतो.

Sunny Deol Gadar 2
Gadar 2 Vs Jailer : गदरला चित्रपटगृहांचा 'फेव्हर', तरीही हटला नाही 'जेलर'! रजनीनं सनीला दिली जोरदार टक्कर

नुकतच गदर २ च्या चित्रपटानं भव्य यशानिमित्तानं एका पार्टीचे आयोजन केले होते. त्यात दिग्दर्शक शर्मा यांनी तिसऱ्या भागाचे संकेत दिले होते. अशातच सनीनं त्याच्या गदर २ चित्रपटाच्या यशाचे श्रेय नव्या सूनबाईला दिले आहे. गेल्या महिन्यात त्याच्या मुलाचं करण देओलचं लग्न झालं होतं. करणनं दृषा आचार्यसोबत लग्न केलं. त्या लग्न सोहळ्याला बॉलीवूमधील वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती.

काही दिवसांपासून देओल परिवारात आनंदाचे, उत्साहाचे वातावरण आहे. करण देओलचे लग्न, त्याचे आणि दृषाचे एकत्र येणे, रॉकी और रानी की प्रेम कहानीमध्ये धर्मेंद्र यांच्या कामाचे प्रेक्षकांनी केलेलं कौतूक, आणि सनीच्या गदर २ ला मिळालेलं यश यामुळे सगळीकडे त्यांची प्रशंसा होताना दिसत आहे.

Sunny Deol Gadar 2
Gadar 2 Box Office Day 5: स्वातंत्र्यदिनी गदर 2 सुसाट! सगळे रेकॉर्ड मोडत केली 'इतक्या' कोटींची कमाई...

सनीनं त्याच्या गदर २ चे श्रेय हे दृषा आचार्यला दिले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देओल कुटूंबातील एका जवळच्या व्यक्तीनं हा खुलासा केला आहे. त्यानं सांगितले की, घरात आलेली नवीन सून ही लकी चार्म असल्याची सनीची भावना आहे. त्यामुळे त्यानं आपल्या चित्रपटाचे सारे श्रेय तिला दिले आहे. काही दिवसांपूर्वी सनी देओल, बॉबी देओल हे सावत्र बहिण ईशा देओल आणि अहाना देओलची भेट घेताना दिसले होते. त्याचीही चर्चा झाली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.