Sunny Deol Reaction On Bank Notice : बंगल्याच्या जप्ती प्रकरणावर सनी पहिल्यांदाच बोलला, 'मी जर...'

काही दिवसांपासून सनी हा त्याच्या बंगल्याच्या जप्तीच्या नोटीशीमुळे पुन्हा चर्चेत आला आहे.
Sunny Deol broke silence on non payment of loan and auction :
Sunny Deol broke silence on non payment of loan and auction :
Updated on

Sunny Deol broke silence on non payment of loan and auction : एकीकडे सनीचा गदर २ फुल फॉर्ममध्ये असताना त्याची डोकेदुखी वाढवणारी बातमी समोर आली. त्यामुळे केवळ सनीच नाहीतर त्याच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. सनीच्या बाबत असे काही होईल याबाबत कुणालाही माहिती नव्हते. गदर २ फेम तारा सिंगच्या घरावर जप्तीची नोटीस बँकेनं काढली होती.

काही दिवसांपासून सनी हा त्याच्या बंगल्याच्या जप्तीच्या नोटीशीमुळे पुन्हा चर्चेत आला आहे. हे प्रकरण फारच चर्चेत आल्यानं अखेर बँकेनं ती जप्तीची नोटीस मागे घेतल्याचे दिसून आले. यासगळ्यात सनीच्या नावाची चर्चा झाली. सोशल मीडियावर देखील त्यावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रियांना उधाण आले होते. त्यात पहिल्यांदाच सनीनं दिलेली प्रतिक्रिया चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

सनीनं बँक ऑफ बडोदाकडून ५६ कोटींचे कर्ज घेतले होते. ते त्यानं बँकेनं दिलेल्या मुदतीत न दिल्यानं बँकेने त्याला नोटीस पाठवली. त्यात येत्या काही दिवसात सनीच्या बंगल्यावर जप्तीची कारवाई केली जाणार असे म्हटले होते. त्यानंतर काही ती नोटीस मागे घेण्यात आली. यासगळ्यात सनीच्या कुटूंबाच्या वतीनं देखील प्रतिक्रिया आलेली नाही. सनीनं त्यावर पहिल्यांच त्याची बाजू मांडली आहे.

एएनआयला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये सनीनं म्हटलं आहे की, मला या सगळ्या प्रकरणावर काहीही बोलायचे नाही. मुळात हा माझा वैयक्तिक विषय आहे. त्यावर तुम्हाला बोलण्याचा किंवा जाणून घेण्याचा अधिकार नाही. मी जर काही बोललो तर तुम्ही त्याचा वेगळा अर्थ लावाल. असे बोलून सनीनं त्या गोष्टीवर स्पष्टपणे मत व्यक्त केले आहे.

Sunny Deol broke silence on non payment of loan and auction :
Ghoomer Review: एक हात नसला म्हणून काय झालं, मनात आणलं तर काहीही अशक्य नाही सांगणारा 'घूमर'

दुसरीकडे सनीच्या टीमनं देखील यावर एक ऑफिशियली स्टेटमेंट दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, आम्ही सध्या त्या बँकेशी संबंधित मुद्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. लवकरच त्याबाबत योग्य ती भूमिका घेतली जाईल. ज्या समस्या आहेत त्या पूर्णपणे सोडवल्या जातील. त्यामुळे ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत त्यात तथ्य नाही. असे टीमकडून सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.