Sunny Deol News: सनी देओलच्या गदर 2 सिनेमाने बॉक्स ऑफीसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली. सनी देओलच्या गदर 2 ने सर्वांचं प्रेम मिळवलं. सनी देओलने काही दिवसांपुर्वी गदर 2 ची सक्सेस पार्टीही साजरी केली.
सनी देओलने एक खास गोष्ट केलीय. ती म्हणजे त्याने सोशल मिडीयावर मराठी सिनेमाचं प्रमोशन केलंय. हा सिनेमा म्हणजे आत्मपॅफ्लेट.
(sunny deol promote marathi movie Aatmapamphlet)
सनी देओलने केलं आत्मपॅफ्लेट सिनेमाचं प्रमोशन
सनी देओलने त्याच्या सोशल मिडीयावर आत्मपॅफ्लेट सिनेमाचं प्रमोशन केलंय. सनी देओलने सोशल मिडीयावर आत्मपॅफ्लेट सिनेमाचं प्रमोशन केलंय.
सनीने आत्मपॅफ्लेट चं प्रमोशन करताना त्याच्या बालपणीचे फोटो शेअर केलेत. या फोटोत सनी अत्यंत क्यूट दिसत असून त्याच्या या फोटोला त्याच्या फॅन्ससनेही पसंती दर्शवली आहे.
बर्लिन आंतराराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील स्पर्धात्मक विभागात आत्मपॅम्फ्लेटचा वर्ल्ड प्रीमियर झाला. तसेच नुकत्याच झालेल्या आशिया पॅसिफिक स्क्रीन अवॉर्ड्स ऑस्ट्रेलियामधे सत्तर देशांमधल्या चित्रपटांमधून सर्वोत्कृष्ट युथ फिल्मचा पुरस्कारही या चित्रपटाला मिळाला.
वाळवी सिनेमाचे दिग्दर्शक परेश मोकाशींनी हा सिनेमा लिहीला आहे.
आत्मपॅफ्लेट सिनेमाची रिलीज डेट
आत्मपॅफ्लेट या चित्रपटात ओम बेंडखळे, प्रांजली श्रीकांत, भीमराव मुडे आणि केतकी सराफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. गुलशन कुमार, टी सिरीज फिल्म्स, कलर यल्लो प्रोडक्शन्स आणि झी स्टुडिओज प्रस्तुत, मयसभा करमणूक मंडळी निर्मित या चित्रपटाचे भूषण कुमार, क्रिशन कुमार, आनंद एल. राय, कनुप्रिया ए. अय्यर, मधुगंधा कुलकर्णी आणि झी स्टुडिओज 'आत्मपॅम्फ्लेट'चे निर्माते आहेत. हा चित्रपट ६ ऑक्टोबर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.