Sunny Deol On Nepotism: बॉलीवूड अभिनेता सनी देओल हा सध्या त्याच्या आगामी 'गदर 2' चित्रपटामुळे चर्चेत आहे. सनी आणि अमिषा दोघेही या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्यांनी बऱ्याच मुलाखती देखील दिल्या आहेत. अशाच एका मुलाखतीत त्याने नेपोटिझमवर भाष्य केलं आहे. त्याच्या या वक्तव्यांची सोशल मिडियावर खुपच चर्चा होत आहे.
नेपोटिझमवर बोलतांना, सनी देओल म्हणतो की, जर त्याचे वडील धर्मेंद्र हे अभिनेता झाले नसते, तर कदाचित त्याच्या वडिलांनी जिथं काम केलं असतं तिथे तो काम करत राहिला असता. त्याचबरोबर त्याचा मुद्दा मांडतांना सनी देओलनं हे देखील कबूल केलं की त्याचे वडील हे दिग्गज स्टार आहेत, त्यामुळे त्यांला अभिनेता बनण्यासाठीचं व्यासपीठ आणि संधी लवकर मिळाली.
सनी देओलने अलीकडेच आजतकला मुलाखत दिली. सनी देओलने आपल्या मुलाखतीत सांगितलं की, घरातील मुलं ही वडिलाना फॉलो करतात. त्यांचे अनुसरण करत असतात. जे निराश झाले आहेत त्यांनी असे द्वेष आणि नेपोटिझम सारख्या शब्दांचा वापर करायला सुरुवात केली आहे.
प्रत्येक वडिलांना आपल्या मुलासाठी काहीतरी करावं असं वाटतं आणि त्यात गैर असं काही नाही. वडील हे कोणासाठी काम करत असतील तर ते कुटुंबासाठी...त्यात गैर काय? पण जो स्वतः मेहनत करतो तो यशस्वी होतो. आपण समजून घेतले पाहिजे की कुटुंबात मूल त्यांच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवतो.
पुढे तो म्हणतो की, 'माझे वडील मोठे स्टार आहेत, पण मी इंडस्ट्रीत माझी वेगळी ओळख निर्माण केली आहे. मी माझ्या वडिलांसारखा नसलो तरी थोड्याफार प्रमाणात आम्ही सारखेच आहोत. माझे वडील माझ्यात शिरून मला अभिनेता बनवू शकले नाहीत. तसचं मी देखील माझ्या मुलांना अभिनेता बनवू शकत नाही. नक्कीच यात अडचणी आहेत मात्र त्याचा मी फार विचार केलेला नाही.'
गदर 2 हा सिनेमा 22 वर्षांपूर्वी आलेल्या गदर: एक प्रेम कथा सिनेमाचा दुसरा भाग आहे. गदर 2 ची कथा पहिल्या चित्रपटाशी जोडली गेली आहे. आता गदर 2 सिनेमा 11ऑगस्टला रिलीज होणार आहे. गदर 2 पहिल्या दिवशी जवळपास 25 कोटींचा गल्ला जमवू शकतो असा अंदाज या चित्रपटाच्या बुकिंगवरून वर्तवला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.