Sunny Leone: माधूरी दिक्षीतच्या गाजलेल्या 'मेरा पिया घर आया' गाजलेल्या गाण्यावर सनी लिओनी थिरकणार, झलक बघाच

सनी लिओनी माधूरीच्या गाजलेल्या गाण्यावर थिरकली आहे
sunny leone remake of madhuri dixit famous song mera piya ghar aaya 2.0
sunny leone remake of madhuri dixit famous song mera piya ghar aaya 2.0 SAKAL
Updated on

सध्या अनेक जुन्या गाजलेल्या गाण्यांचे रिमेक निघत आहेत. आगामी आँख मिचोली सिनेमात तुनूक तुनूक टू तारारा या दलेर मेहंदींच्या गाजलेल्या गाण्याचा रिमेक पाहायला मिळणार आहे. इतकंच नव्हे तर याआधी ये मेरा दिल, लैला मे लैला अशा गाण्यांचा रिमेक बघायला मिळाला आहे.

अशातच याराना सिनेमातील माधूरी दिक्षीतच्या गाजलेल्या मेरा पिया घर आया या गाण्याचा रिमेक भेटीला येणार आहे. सनी लिओनी या रिमेकवर थिरकणार आहे.

(sunny leone remake of madhuri dixit famous song mera piya ghar aaya)

sunny leone remake of madhuri dixit famous song mera piya ghar aaya 2.0
Nanded Hospital: संडास साफ करा, जात बघून सांगायचे तर.... केतकी काय बोलून गेली!

अभिनेत्री सनी लिओनी सध्या अनेक कारणांसाठी चर्चेत असताना ती आता या अफलातून गाण्याच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बॉलीवूडच्या रसिकांना सनी लिओनीचा एक रोमांचक आणि आनंददायक परफॉर्मन्स बघायला मिळणार असून जेव्हा, माधुरी दीक्षितने एकेकाळी गाजवलेला प्रसिद्ध डान्स नंबर पुन्हा तयार करण्यासाठी सनी लिओनी तयार झाली आहे.

खूप अपेक्षेनंतर आता गाण्याचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे हे गाणे 8 ऑक्टोबर रोजी रिलीज होत आहे. "मेरा पिया घर आया" गाण्याची झलक इतकी जबरदस्त आहे तर गाणं नक्कीच भारी असेल. हे मूळ गाणं 1995 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट यारानामध्ये प्रदर्शित केले गेले होते. ज्याला बॉलीवूडच्या चाहत्यांनी खूप प्रेम दिलं.

sunny leone remake of madhuri dixit famous song mera piya ghar aaya 2.0
Bhau Kadam - Ashok Saraf: भाऊ कदमने अशोक मामांच्या पायावर घातलं लोटांगण! व्हिडिओला नेटकऱ्यांचा तुफान प्रतिसाद

आता हे गुपित उघड झाले आहे की माधुरी आणि सनी या दोघांच्याही चाहत्यांसाठी हा नॉस्टॅल्जिया ठरणार आहे." मेरा पिया घर आया 2.0" या प्रतिष्ठित गाण्यात सनी लिओनी तिच्या अप्रतिम नृत्य सादरीकरणाने चाहत्यांना मोहित करणार आहे.

प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक विजय गांगुली यांनी हा डान्स कोरिओग्राफ केला आहे.

या रिमेकची चर्चा सगळीकडे होत असताना पूर्ण गाणं पाहण्यासाठी प्रेक्षकांच्या आणखी थोडी वाट बघावी लागेल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.