Sunny Leone: तुर्की-सीरियातील भूकंपग्रस्तांच्या मदतीला सनी लिओनी धावली..

Sunny Leone
Sunny LeoneEsakal
Updated on

तुर्की आणि सीरियाला विनाशकारी भूकंपाचा धक्काने पुर्णपणे तोडून टाकले आहे. बसल्याच्या घटनेला बरेच दिवस झाले असूनही अजूनही मदत कार्य सुरु आहे. मृत्युमुखी पडलेल्यांच्या संख्येतही दररोज भर पडत असून ही संख्या सध्या ३३ हजारांच्या वर गेली आहे.

सर्व जग तुर्कस्तान आणि सीरिया भूकंपग्रस्तांना मदत देण्यासाठी जग एकत्र आले आहे. तुर्कस्तान आणि सीरियाच्या स्थितीवर संपूर्ण जगाचे डोळे लागले आहेत आणि सर्वजण एकच प्रार्थना करत आहेत की भूकंपाच्या प्रभावातून हा देश लवकरात लवकर बाहेर यावा.

Sunny Leone
Sanjay Leela Bhansali: संजय लीला भन्साळी मोठा पडदा सोडून ओटीटी का गाठलं? कारण सांगतांना म्हणे...

भारतानेही त्यांची शक्य तितकी मदत केली असून अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही तुर्की आणि सीरियाच्या स्थितीबद्दल दु:ख व्यक्त केले आहे आणि त्यांच्यासाठी सतत प्रार्थनाही करत आहेत. आता अभिनेत्री सनी लिओनीने तुर्की आणि सीरियाला मदतीचा हात पुढे केला आहे.

Sunny Leone
Swara Bhaskar On Kangana: 'आता तू पण....', स्वरानं कंगनाला दिला मोलाचा सल्ला

बॉलीवूडचे जोडपे सनी लिओन आणि डेनियल वेबर देखील तुर्की आणि सीरियातील पीडितांसाठी योगदान देत आहेत. या जोडप्याने त्यांच्या कॉस्मेटिक ब्रँडच्या फेब्रुवारीच्या कमाईतील 10 टक्के रक्कम सीरिया आणि तुर्कीमधील भूकंपग्रस्त लोकांच्या मदतीसाठी दान करण्याचा निर्णय घेतला आहे.

Sunny Leone
Shehzada Box Office Collection Day 2: 'शहजादा' चे लाड 'पठाण' पुढे चालेना! दुसऱ्या दिवशी किती कमावले?

सनी लिओनी म्हणाली की प्रत्येकाने मदतीचा हात पुढे करणं आवश्यक आहे आणि लोकांना 'बचावलेल्यांना त्यांचं जीवन पुन्हा पुर्वरतपणे सुरु करण्यात मदत करा' असे आवाहन केले. हे दोघे आपली कमाई सीरिया आणि तुर्कीमधील प्रभावित भागात राहणाऱ्यांसाठी काम करणाऱ्या धर्मादाय संस्थांना देणार आहेत. याआधी जागतिक युनिसेफ सद्भावना दूत आणि अभिनेत्री प्रियांका चोप्राने भूकंपानंतर पीडितांना मदतीचा हात पुढे करण्याचे आवाहन केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.