Rajinikanth Latest News चेन्नई : सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांनी ३१ डिसेंबर २०१७ रोजी राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा केली होती. यानंतर रजनीकांत हे २०१७ ते २०२१ पर्यंत त्यांच्या पक्ष रजनी मक्कल मंद्रमसोबत (RMM) राजकारणात होते. मात्र, रजनीकांत यांनी १२ जुलै २०२१ रोजी पक्ष विसर्जित केला होता. सोबत कधीही राजकारणात परतण्याचा विचार नसल्याचे म्हटले होते. आता त्यांनी याबाबत पुन्हा भाष्य केले आहे.
एएनआयने सोमवारी (ता. ८) सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांना राजकारणात परतण्याची योजना आहे का, असा प्रश्न केला असता त्यांनी नाही म्हटले. राजकारणात परतण्याचा त्यांचा कोणताही विचार नसल्याचे रजनीकांत यांनी म्हटले. अभिनेत्याने सोमवारी तामिळनाडूचे राज्यपाल आरएन रवी यांच्याशी संवाद साधला होता. त्यांनी राज्यपालांशी राजकारणावर (Politics) चर्चा केली असे सांगण्यात आले. मात्र, रजनीकांत यांनी राज्यपालांची भेट कशासाठी घेतली हे सांगितले नाही.
सुपरस्टार रजनीकांत यांनी ३१ डिसेंबर २०१७ रोजी राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा केली आणि १२ जुलै २०२१ रोजी पक्ष रजनी मक्कल मंद्रम (RMM) विसर्जित केला. त्याआधी रजनीकांत यांनी द्रमुक आणि तमिळ मनिला काँग्रेस आघाडीला पाठिंबा दिला होता. रजनीकांत यांनी १९९६ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत व १९९८ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत DMK-तमिळ मनिला काँग्रेस आघाडीलाही पाठिंबा दिला, हे विशेष...
२९ डिसेंबर २०२० रोजीही रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करणार नसल्याचे सांगितले होते. ‘रजनीकांत यांनी कधीही राजकारणात प्रवेश करणार नाही असे म्हटले नव्हते. ते फक्त निवडणुकीच्या मैदानात प्रवेश करणार नाही’ असे रजनीकांत यांचे सहकारी आणि गांधीय मक्कल इयक्कमचे संस्थापक तमिलारूवी मानियन म्हणाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.