'सुपरमॅन' फेम अभिनेता नेड बीटी यांचे निधन

अमाप लोकप्रियता बीटी यांना मिळाली.
actor ned beatty
actor ned beattyTeam esakal
Updated on

मुंबई - जगभरातील प्रेक्षकांना ज्या चित्रपटांनी वेड लावले त्यात हॉलीवूडच्या (hollywood) सुपरमॅनच्या सिरिजचाही (superman serise) उल्लेख करावा लागेल. या चित्रपटांमध्ये सुपरमॅनची भूमिका करणा-या नेड बीटी यांचे दीर्घ आजारानं निधन झाले आहे. ते 83 वर्षांचे होते. नेड अनेक आजारानं त्रस्त होते. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्या आजाराशी त्यांची झुंज अपयशी ठरली. त्यांच्या परिवारातील सदस्य आणि मित्रपरिवार बीटी यांच्या शेवटच्या क्षणी सोबत होते. (superman fame actor ned beatty passed away at the age of 83)

बीटी (bt) यांना नेमकी कोणती शाररिक व्याधी होती हे आतापर्यत स्पष्ट झालेले नाही. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचे निधन हे काही कोरोनानं झालं नाही. हे सांगण्यात आलं आहे. बीटी यांच्या करिअरची गोष्ट करायची झाल्यास त्यांनी पाच दशकांहून अधिक काळ चित्रपट क्षेत्रात आपले योगदान दिले. त्यात त्यांनी अनेक यशस्वी चित्रपट दिले. 1976 मध्ये आलेल्या नेटवर्क या चित्रपटात त्यांच्यावर चित्रित करणयात आलेले मोनोलॉग सीन प्रेक्षकांच्या पसंतीस पडले होते.

actor ned beatty
राब्ता : कृति सेनन नाही, तर आलियाच होणार होती सुशांतची 'हिरोईन'; पण..

अमाप लोकप्रियता बीटी यांना मिळाली. नेटवर्कमध्ये केलेल्या अभिनयाबद्दल त्यांचे नाव ऑस्करच्या बेस्ट सपोर्टिंग अॅक्टरच्या नॉमिनेशनसाठी गेले होते. नेड यांचे हॉलीवूडमधील अनेक चित्रपट प्रसिध्द होते. त्यात प्रामुख्यानं उल्लेख करायचा झाल्यास, फ्रेंडली फायर, ऑल द प्रेसिडेंट मेन सिल्वर स्ट्रेक, बॅक टू स्कूल, नॅशविल, कॅप्टन अमेरिका यांचा उल्लेख करावा लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.