Rajinikanth wife fraud case: "सेलिब्रेटी असल्याची किंमत...", सुपरस्टार रजनीकांतच्या पत्नीनं फेटाळले फसवणुकीचे आरोप! काय आहे नेमकं प्रकरण?

Kochadaiyan fraud case: सुपरस्टार रजनीकांत यांची पत्नी लता रजनीकांत यांनी फसवणुकीचे आरोप फेटाळले आहेत.
Kochadaiyan fraud case:
Kochadaiyan fraud case:Esakal
Updated on

Rajinikanth wife fraud case: सुपरस्टार रजनीकांत हे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. त्यांचे सिनेमे प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. त्यांच्या चाहत्यांची संख्या जगभरात आहे. मात्र आता रजनीकांत नव्हे तर त्यांची पत्नी चर्चेत आली आहे. रजनीकांत यांची पत्नी लता रजनीकांत यांच्या विरोधात गेल्या काही काळापासून फसवणुकीचा खटला सुरू आहे.

लतादीदींनी आरोप फेटाळून लावत असा दावा केला की "सेलिब्रेटी असल्याची किंमत मोजावी लागत आहे." लता रजनीकांत यांनी एएनआयला सांगितले, 'ही माझ्यासाठी खूप अपमानाची बाब आहे, हीच किंमत आम्हाला सेलिब्रिटी म्हणून चुकवावी लागली आहे. त्यामुळे प्रकरण मोठं नसलं तरी बातमी खूप मोठी होते. कोणतीही फसवणूक झालेली नाही, माझा पैशांशी काहीही संबंध नाही."

Kochadaiyan fraud case:
Salman Khan Birthday: भाईचा बर्थडे! सलमानच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन, लॉर्ड बॉबीच्या खास अंदाजात शुभेच्छा

ही फसवणूक सुपरस्टार रजनीकांत स्टारर 'कोचादईयां' या चित्रपटाशी संबंधित आहे. हा खटला कर्नाटक उच्च न्यायालयाने रद्द केला असला तरी सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबरमध्ये तो आरोप पुन्हा पूर्ववत केला. आता पत्नी लतादीदींनी या प्रकरणी आपले वक्तव्य केले आहे.

काय आहे प्रकरण

चेन्नईस्थित अॅड ब्युरो अॅडव्हर्टायझिंग प्रायव्हेट लिमिटेडने रजनीकांत यांच्या पत्नीविरुद्ध 2014 च्या चित्रपटाच्या हक्काबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तक्रारकर्त्याने असा दावा केला की त्याने चित्रपटाच्या निर्मात्यांपैकी एक असलेल्या मीडिया वनला 10 कोटी रुपये दिले होते आणि लता रजनीकांत यांनी जामीनदार म्हणून साइन केले होते.

Kochadaiyan fraud case:
Lee Sun-kyun Death: ऑस्कर विजेत्या 'पॅरासाईट' सिनेमातील लोकप्रिय अभिनेत्याचं दुःखद निधन

या आरोपावर लता रजनीकांत म्हणाल्या होत्या की, ज्या पैशांबद्दल बोललं जातंय त्याच्याशी त्यांचा काहीही संबंध नाही. ही बाब मीडिया वन आणि संबंधित लोकांमधील आहे. एक जामीनदार म्हणून मी खात्री केली होती की त्यांना पैसे दिले गेले आहेत.

या प्रकरणी 2022 मध्ये कर्नाटक उच्च न्यायालयाने लतादीदींना दिलासा दिला होता, परंतु काही काळानंतर सर्वोच्च न्यायालयाने लतादीदींवर लावलेली चार कलमे पुन्हा पूर्ववत करण्यात आले. आता या प्रकरणी काय निकाल लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.