Hari Narke: नरके सरांचे कार्य आगामी पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल, खासदार सुळेंनी वाहिली श्रद्धांजली!

खासदार सुप्रिया सुळे यांनी हरी नरकेंच्या कुटुंबाची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं.
Supriya Sule paid tribute to hari narke say his work will be a guide to future generations
Supriya Sule paid tribute to hari narke say his work will be a guide to future generations SAKAL
Updated on

प्रा. हरी नरके यांचे काही दिवसांपुर्वी निधन झालं. हरी नरकेंच्या निधनामुळे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा प्रचार अन् प्रसार करण्यात मोलाचे योगदान देणारा एक साहित्यिक साहित्यिक आणि पुरोगामी विचारविश्वातील चळवळीतील प्रसिद्ध व्यक्तिमत्व आपल्यातुन हरपलं अशा हळहळ व्यक्त होत आहे.

नरके यांच्या निधनानंतर काही नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट केल्या होत्या. अशातच खासदार सुप्रिया सुळे यांनी हरी नरकेंच्या कुटुंबाची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं.

Supriya Sule paid tribute to hari narke say his work will be a guide to future generations
प्राजक्ता माळी म्हणतेय 'तीन अडकून सीताराम', नेमकं प्रकरण काय?

सुप्रिया सुळेंनी हरी नरकेंच्या कुटुंबाची घेतली भेट

"ज्येष्ठ विचारवंत दिवंगत प्रा. हरी नरके यांच्या घरी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. नरके सरांनी फुले शाहू आंबेडकर विचारधारेची ज्योत तेवत ठेवण्यासाठी आयुष्यभर काम केले. त्यांनी करुन ठेवलेले कार्य खुप मोठे असून आगामी पिढ्यांसाठी दिशादर्शक ठरेल. यावेळी त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण केली. याप्रसंगी नरके सरांचे कुटुंबिय आणि सहकारी आदी उपस्थित होते."

सुप्रिया सुळे यांनी हरी नरकेंची मुलगी आणि अभिनेत्री प्रमिती नरके हिला मिठी मारुन तिचं सांत्वन केलं. प्रमिती सुद्धा ताईंसमोर गहिवरली.

प्रमितीने हरी नरकेंवर टिका करणाऱ्यांना सुनावले खडे बोल

प्रमिती वडिलांच्या शोकसभेला विधान केलं की, "२४ तासांपैकी २५ तास किमान वाचन करायला हवं असं बाबा म्हणायचे. जेवण आणि अंघोळी व्यतिरिक्त त्यांना कधीच पुस्तक हातात नाही, असं त्यांना कधीच बघितलं नाही. मला अभिनयाची आवड असताना त्यांनी मला ललित क्रीडामध्ये प्रवेशासाठी त्यांनी ओबीसीमधून प्रवेश घेऊ दिला नाही. ओपनमधून प्रवेश केला आणि मला बाहेर पडताना गोल्ड मेडल मिळालं."

Supriya Sule paid tribute to hari narke say his work will be a guide to future generations
Hari Narke: बाबांच्या विचारांची, कार्याची ज्योत तेवत ठेवायचीय! प्रा. हरी नरकेंच्या मुलीचं हेमांगी कवीने केलं सांत्वन

मी बाबांचा वारसा पुढे नेईल

प्रमितीने टीका करणाऱ्यांना सुनावलं, "विरोधकांना या घटनेचा आनंद झाला. तुमच्यात धमक असेल तर विचारांनी त्याला उत्तर द्या… त्यांच खंडण करुन दाखवा. तुमच्या टीकेने काही फरक पडत नाही. याउलट माझे बाबा मोठे होत आहे. मी हरी नरके यांची मुलगी आहे… माझ्या क्षेत्रात मी त्यांचा वारसा पुढे नेईल. एका गोष्टीची खंत आहे. ती म्हणजे मी जो सिनेमा लिहिला… तो बाबांनी बघायचा राहिला. अशा शब्दांत प्रमितीनं तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.