Surekha Punekar: लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचा राष्ट्रवादीला रामराम! आता हैद्राबादच्या....

सुरेखा यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत वेगळ्या पक्षात प्रवेश केलाय.
surekha punekar left ncp and join brs political party in hyderabad telangana
surekha punekar left ncp and join brs political party in hyderabad telangana SAKAL
Updated on

Surekha Punekar News: गेल्या काही काळात अनेक मराठी कलाकारांनी आणि अभिनेत्रींनी राजकीय पक्षात प्रवेश केलाय. आता यात लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांची भर पडलीय. सुरेखा यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत वेगळ्या पक्षात प्रवेश केलाय.

सुरेखा पुणेकर यांनी हैद्राबादच्या BRS पार्टीत प्रवेश केलाय. तेलंगणाचे मुख्ममंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत सुरेखा पुणेकर यांनी काल (बुधवारी) भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला.

(surekha punekar left ncp and join brs political party in hyderabad telangana)

तेलंगणाचे मुख्यमंत्री के.सी.राव यांच्या उपस्थितीत सुरेखा यांनी BRS पक्षात प्रवेश केला आहे. पक्षप्रवेशाआधी सुरेखा पुणेकर या दोन दिवसांआधीच हैद्राबादमधील डेरे येथे दाखल झाल्या होत्या.

त्यासंदर्भात त्यांनी अनेक भेटीगाठीही केल्या. आता सुरेखा यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ काढून BRS चा झेंडा हाती घेतला आहे.

surekha punekar left ncp and join brs political party in hyderabad telangana
Adipurush 6th day box office: कमाईची गाडी घसरली.. आदिपुरुषची सहाव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर सुमार कामगिरी

काही दिवसापुर्वी सुरेखा आणि प्रविण दरेकर यांच्यात शाब्दिक चकमक झाली. सुरेखा पुणेकरांनी आपल्या खास शैलीत उत्तरही दिलं होतं.

"घाण तोंडाचे प्रवीण दरेकर भाजपसारख्या चांगल्या लोकांच्या पक्षात कसे काय,'' असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

surekha punekar left ncp and join brs political party in hyderabad telangana
Asit Modi FIR: सर्वांसमोर माझी माफी मागा नाहीतर... जेनिफर आणि असित मोदींमधला वाद टोकाला

सुरेखा यांना विधानसभा निवडणूका लढवायची ईच्छा असल्याचं त्यांनी सांगितलं. मोहोळ किंवा देगूलूरमधून BRS च्या तिकिटावर सुरेखा पुणेकर लढण्याची शक्यता आहे. सुरेखा या 'बिग बॉस मराठी २'मध्ये सहभागी झाल्या होत्या.

मोहोळ विधानसभा मतदार संघातून २००९ मध्ये राष्ट्रवादी कॉग्रेसकडून त्या इच्छुक असल्याची चर्चा होती. पण पक्षप्रवेश झाला नव्हता.

त्यावर मात्र कुठल्याच अपेक्षेने राष्ट्रवादीत प्रवेश करीत नाही, असे स्पष्टीकरण सुरेखा पुणेकर यांनी दिलं होतं.बिग बॉसमुळे त्या चांगल्याच चर्चेत आल्या आणि त्यानंतरच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()