Suriya Birthday : फॅक्टरीमध्ये नोकरीला होता, पण भावानं नाद नाय सोडला!

जय भीम, सिंघम, रक्तचरित्र, विक्रम वेधा सारख्या चित्रपटांतून लोकप्रिय झालेल्या सुर्याच्या येणाऱ्या प्रत्येक चित्रपटाविषयी प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता असते.
Suriya Birthday Story Kanguva Teaser Viral Fans prasied
Suriya Birthday Story Kanguva Teaser Viral Fans prasiedesakal
Updated on

Suriya Birthday Story Kanguva Teaser Viral Fans prasied : भारतामध्ये असे काही अभिनेते आहे ज्यांच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. त्यात साऊथचे सुपरस्टार रजनीकांत ते बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांची गोष्टच वेगळी आहे. मात्र याशिवाय आणखी एका अभिनेत्यानं आपला वेगळा ठसा टॉलीवूड चित्रपटविश्वावर उमटवला आहे. त्याचे नाव सुर्या.

सुर्याचा जय भीम नावाचा चित्रपट ज्यांनी पाहिला असेल त्यांना तो काय उंचीचा अभिनेता आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यानं त्याच्या अभिनयानं भारतात मोठं नाव कमावलं आहे. आज कोट्यवधी चाहत्यांच्या कौतूकाचा विषय झालेल्या सुर्याचा संघर्ष आणि त्याचा जीवनप्रवास खूपच वेदनादायी होता. त्यानं याविषयी त्याच्या काही मुलाखतीमध्ये सांगितले होते. आज त्याबद्दल सांगितल्यास विश्वास ठेवणं कठीण होऊन जाईल.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

सुर्यानं अल्पावधीत त्याची छाप केवळ टॉलीवूडच नाहीतर बॉलीवूडवर देखील सोडली आहे. गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडमध्ये त्याच्या चाहत्यांची संख्या वाढताना दिसते आहे. त्याच्या चित्रपटांना मिळणारा प्रेक्षकवर्ग मोठा आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा दसरा नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. बॉक्सऑफिसवर या चित्रपटानं विक्रमी कमाई केली होती.

आज सुर्याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं आपण त्याच्याशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत. जय भीम, सिंघम, रक्तचरित्र, विक्रम वेधा सारख्या चित्रपटांतून लोकप्रिय झालेल्या सुर्याच्या येणाऱ्या प्रत्येक चित्रपटाविषयी प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता असते. सुर्याचा जन्म २३ जुलै १९७५ रोजी झाला. त्याचे वडील शिवकुमार तमिळ अभिनेते म्हणून प्रसिद्ध होते. सुर्याला देखील अभिनेता होण्याचे स्वप्न होते.त्यासाठी त्यानं खूप मेहनतही केली होती. पण त्याला यश येत नव्हते.

Suriya Birthday Story Kanguva Teaser Viral Fans prasied
Sunny Leone : जिस्म 2 मध्ये काम तर मिळालं पण...! सनी महेश भट्ट यांच्याविषयी काय म्हणाली?

आर्थिक चणचण जाणवू लागल्यामुळे सुर्यानं काही काळ एका कपड्याच्या फॅक्टरीमध्ये कामही केले. विशेष म्हणजे त्याचा भाऊ कार्तिक शिवकुमार हा देखील फिल्म उद्योग विश्वातील एक लोकप्रिय अभिनेता आहे.

Suriya Birthday Story Kanguva Teaser Viral Fans prasied
Oppenheimer Review : अमेरिका जशी डोक्यावर घेते तशीच ती...! 'ओपनहायमर'ला बोटावर नाचवलं

टॉलीवूडमध्ये सगळे त्याला सुर्या नावानं ओळखत असतील, पण त्याचे खरे नाव हे सखनन शिवकुमार असे आहे. मणिरत्नम यांनी त्याला सूर्या हे नाव दिले. त्यानंतर तो याच नावानं लोकप्रिय झाला. २००६ मध्ये सूर्यानं तमिळ अभिनेत्री ज्योतिकाशी लग्न केले. एका चित्रपटाच्या निमित्तानं त्यांची ओळख झाली आणि त्या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यांनी काका काका, पेराझागन, सिलूनु सारख्या चित्रपटात एकत्र काम केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.