Suriya Fan Died: सुर्याच्या वाढदिवसाला गालबोट! बॅनर लावताना वीजेचा धक्का लागल्याने मृत्यु

टॉलिवूड अभिनेता सूर्याचा नुकताच 23 जुलैला वाढदिवस झाला. पण या वाढदिवसाला मात्र गालबोट लागलंय
suriya two young fan died due to electric shock in andhra pradesh
suriya two young fan died due to electric shock in andhra pradeshSAKAL
Updated on

Suriya Fan Died News: टॉलिवूड अभिनेता सूर्याचा नुकताच 23 जुलैला वाढदिवस झाला. पण या वाढदिवसाला मात्र गालबोट लागलंय.

सूर्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या दोन फॅन्सच्या मृत्यु झाला. पालनाडू जिल्ह्यात सुर्याच्या वाढदिवसानिमित्त बॅनर लावताना विजेचा धक्का लागून मृत्यू झाला.

(suriya two young fan died due to electric shock in andhra pradesh)

suriya two young fan died due to electric shock in andhra pradesh
Bigg Boss Ott 2: एकाच दिवशी दोघे घराबाहेर.. फलक नाज - जैद हदीदचा खेळ संपला, फॅन्स झाले खुश

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशातील पालनाडू जिल्ह्यातील मोपुलावरीपालम गावात विजेच्या धक्क्याने नरसरावपेट मंडळाचे नक्का व्यंकटेश आणि पोलुरी साई यांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही अभिनेता सूर्याचे बॅनर लावण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना विजेचा धक्का बसला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्लेक्सीचा लोखंडी रॉड ओव्हरहेड इलेक्ट्रिक वायरच्या संपर्कात आल्याने ही घटना घडली. यात दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला.

पोलीस अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही मृत व्यक्ती नरसरावपेठ येथील एका खाजगी पदवी महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिकत होते.

मृतदेह नरसरावपेठ शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. पोलुरी साईची बहीण अनन्या हिने तिच्या भावाच्या मृत्यूसाठी कॉलेजला जबाबदार धरले.

suriya two young fan died due to electric shock in andhra pradesh
PM Modi : मोदींनी सनातन धर्मासाठी.. रामलल्लाचे दर्शन घेतल्यावर दीपीका चिखलीयांनी केलं पंतप्रधानांचं कौतुक

मृत पावलेल्या पोलुरी साईची बहीण म्हणाली, "माझ्या भावाच्या मृत्यूला कॉलेज जबाबदार आहे. आम्ही कॉलेजला भरमसाठ फी भरतो.

कॉलेजमध्ये येण्यापूर्वी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि देखरेख केली जाईल. पण कॉलेज, वसतिगृहातील विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि देखरेख करत नाही.

आम्ही रोजंदारी कामगार आहोत. कॉलेजची फी भरण्यासाठी आम्ही खूप संघर्ष करतो, माझ्या भावाच्या चांगल्या आयुष्यासाठी धडपडत असताना ही घटना घडली."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.