Suriya: म्हणून तू ग्रेट! फॅनचा अपघातात मृत्यू झाल्याचं कळताच कुटुंबाला धीर द्यायला पोहोचला सुपरस्टार

साऊथ अभिनेते ग्रेट का असतात याचं उदाहरण नुकतंच समोर आलंय
Suriya visited fan Aravind's house and offered prayers and condolences to the family for the loss
Suriya visited fan Aravind's house and offered prayers and condolences to the family for the loss SAKAL

Suriya meet Fan Family News: एखादा कलाकार आवडला तर फॅन्स त्याच्यावर अगदी जीव ओवाळून टाकतात. साऊथमध्ये ही क्रेझ प्रचंड आहे. आपल्या लाडक्या अभिनेत्याला भेटता यावं, त्याच्यासोबत फोटो काढता यावा म्हणून हे फॅन्स सतत धडपड करत असतात.

या फॅन्सची जाणीव आणि दखल साऊथचे अभिनेते वेळोवेळी घेत असतात. अशीच एक हृदयस्पर्शी घटना नुकतीच घडली. जेव्हा फॅनचा मृत्यू झालाय हे कळताच साऊथ अभिनेता सूर्या त्या फॅनच्या कुटुंबाला भेटायला गेला.

(Suriya visited fan Aravind's house and offered prayers)

Suriya visited fan Aravind's house and offered prayers and condolences to the family for the loss
Siddharth: चालू पत्रकार परिषद सोडावी लागली, अभिनेता सिद्धार्थच्या कार्यक्रमात आंदोलकांचा राडा, हे ठरलं कारण

फॅनच्या कुटुंबाला धीर द्यायला सूर्या थेट घरी गेला

साऊथचा सुपरस्टार अभिनेता सूर्याने नुकतीच त्याचा एका फॅन अरविंदच्या घरी जाऊन त्याला अखेरची श्रद्धांजली वाहिली. अरविंदचा रस्ता अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर सूर्याने चेन्नईतील एन्नोर येथील त्याच्या घरी जाऊन कुटुंबाचे सांत्वन केले. अभिनेत्याने फॅनच्या चित्रासमोर हात जोडून श्रद्धांजली वाहिली. सूर्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

सूर्याच्या या कृतीने सर्व भारावले

सूर्याच्या एका फॅन पेजने सोशल मीडियावर हे फोटो पोस्ट केले आहेत. एका फोटोमध्ये सूर्या फॅनच्या फ्रेम केलेल्या फोटोसमोर हात जोडून दिसत आहे. इतर फोटोंमध्ये तो फॅन्सच्या कुटुंबासोबत गप्पा मारुन त्यांना धीर देताना दिसत आहे.

सूर्याने याआधीही अनेकदा त्याच्या फॅन्सची काळजी घेतलीय. अशी दुःखद घटना घडल्यावर सूर्या भावूक होत अनेकदा फॅन्सच्या कुटुंबाला भेटला आहे. सूर्या आगामी कंगुवा सिनेमात झळकणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com