Rajinikanth: साऊथचा हा सुपरस्टार रजनीकांत यांच्या Thalaivar 170 मध्ये करणार कॅमिओ, चित्रपटाबाबत हे अपडेट आले समोर

रजनीकांत यांच्या चित्रपटांची त्यांचे चाहते आतुरतेने वाट पाहत असतात.
rajinikanth
rajinikanth Sakal
Updated on

रजनीकांत यांच्या चित्रपटांची त्यांचे चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. रजनीकांत यांची खासियत म्हणजे ते जेव्हाही चित्रपट घेऊन येतात तेव्हा बॉक्स ऑफिसवर धमाल उडते. यासोबतच रजनीकांत लवकरच त्यांचा आगामी चित्रपट Thalaivar 170 मध्ये दिसणार आहेत. या सुपरस्टारच्या आगामी चित्रपटात प्रेक्षकांना टॉलिवूडमधील दिग्गज सूर्याचा कॅमिओ देखील पाहायला मिळणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रजनीकांतच्या आगामी Thalaivar 170 या सिनेमात टॉलिवूडचा दिग्गज अभिनेता सूर्याचा कॅमिओ देखील दिसणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की सूर्या 15 मिनिटांच्या एक्सटेंड सीनमध्ये दिसणार आहे. सुर्याच्या कॅमिओच्या बातमीनंतर प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, आतापर्यंत या चित्रपटामधील सूर्याच्या भूमिकेबाबत कोणतीही पुष्टी झालेली नाही.

rajinikanth
KKBKKJ Box Office: लवकरच 'किसी का भाई किसी की जान' 100 कोटींच्या क्लबमध्ये होणार सामील, पाचव्या दिवशी केली इतकी कमाई

रजनीकांतचा हा चित्रपट एका खऱ्या घटनेवर आधारित असल्याचं म्हटलं जात आहे. रजनीकांतचा हा चित्रपट लायका प्रॉडक्शनद्वारे बँकरोल केला जात आहे. यासोबतच अनिरुद्ध रविचंदरने चित्रपटाला संगीत दिले आहे. रिपोर्ट्सनुसार हा सिनेमा 2024 पर्यंत थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. यासोबतच रजनीकांत या चित्रपटात पोलिसाच्या भूमिकेत दिसणार असल्याचीही चर्चा आहे.

या चित्रपटाशिवाय रजनीकांत त्यांच्या मोस्ट अवेटेड 'जेलर' चित्रपटातही दिसणार आहेत. मोहनलाल, जॅकी श्रॉफ, शिवा राजकुमार आणि रम्या कृष्णन यांच्यासोबतच 'जेलर'मध्ये अनेक स्टार्स आपलं अभिनय कौशल्य दाखवताना दिसणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()