Sushant Singh Rajput : सुशांतच्या फ्लॅटला अडीच वर्षांनी मिळाला भाडेकरु, त्या फ्लॅटमध्ये अजुनही...

सुशांतनं राहत्या घरी आत्महत्या केली होती. तेव्हापासून त्या घरमालकाला ते घर रेंटवर देता येत नव्हते.
Sushant Singh Rajput
Sushant Singh Rajput esakal
Updated on

Sushant Singh Rajput flat : बॉलीवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या जाण्यानं बॉलीवूडमधील त्याच्या चाहत्यांना, नेटकऱ्यांना मोठा धक्का बसल्याचे दिसून आले. अद्यापही सुशांतच्या आत्महत्येवर वेगवेगळ्या प्रकारे चर्चा सुरु असते. पोलिस तपासातून काही धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.

सुशांतनं राहत्या घरी आत्महत्या केली होती. तेव्हापासून त्या घरमालकाला ते घर रेंटवर देता येत नव्हते. त्याचे कारण सातत्यानं पोलिसांचा असणारा ससेमिरा. गेल्या अडीच वर्षांपासून तो त्या घरामध्ये नवीन भाडेकरु ठेवण्याचा प्रयत्न करत होता. मात्र त्या घरात राहण्यासाठी कुणीही येत नव्हते. यावरुन त्यानं सोशल मीडियावरही काही पोस्ट केल्या होत्या.

Also Read - ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड

सुशांतची ज्या डुप्लेक्स फ्लॅटमध्ये राहत होता त्या फ्लॅटला अडीच वर्षानंतर आता भाडेकरु मिळाला आहे. याविषयी अधिक माहिती देताना ब्रोकरनं सांगितले की, आम्हाला भाडेकरु मिळाला आहे. काही कागदोपत्री व्यवहार होणं बाकी आहे. त्यानंतर संबंधित भाडेकरु त्या फ्लॅटमध्ये राहण्यासाठी येणार आहे.

Sushant Singh Rajput
Genelia Deshmukh : 'वेड तुझा प्रणय हा नवा!'

सुशांत भलेही आता या जगात नसेल मात्र त्याची लोकप्रियता कायम आहे. त्याचा चाहतावर्ग मोठा असून त्याच्याशी संबंधित वेगवेगळ्या पोस्ट सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. त्याच्या आत्महत्या संबंधीचा जो तपास सुरु आहे त्यात कोणतीही अपडेट समोर येताच ती जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असल्याचे दिसून आले आहे.

Sushant Singh Rajput
Ved Review : रितेश-जेनेलियाचा प्रेमात पाडणारा 'वेड'! अभिनय, गाणी सगळंच 'लई भारी'

सुशांतनं २०२० मध्ये त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली. त्या घटनेनंतर फ्लॅटमध्ये राहण्यास कुणीही तयार नव्हते. बरेचजण घाबरत असल्याचे ब्रोकरनं म्हटले होते. त्या घराचे मालक परदेशात राहतात. त्यामुळे ते बऱ्याच काळापासून भाडेकरुच्या शोधात होते. आता ती प्रतिक्षा संपली असून अडीच वर्षानंतर का होईना त्या फ्लॅटला भाडेकरु मिळाला आहे. त्या फ्लॅटसाठी भाडेकरुला महिन्याला पाच लाख रुपये द्यावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.