Sushant Singh Rajput Case: अमेरिकेत लपलेत सुशांतच्या मृत्यूचे पुरावे? 2 वर्षांपासून सीबीआयचा US पोलिसांशी पाठपुरावा

sushant singh rajput
sushant singh rajputEsakal
Updated on

CBI in Sushant Singh Rajput case: सुशांत सिंग राजपूतने टीव्ही ते बॉलिवूड असा प्रवास करुन प्रेक्षकांच्या मनात वेगळ स्थान निर्माण केलं होतं. आताही सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ३ वर्षांनंतर नवा ट्विस्ट येताना दिसत आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की त्यांना या प्रकरणाशी संबंधित काही महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात काय नवीन माहिती समोर येते याकडे लक्ष लागले आहे. दोषींना शिक्षा व्हावी ही सुशांतचे कुटूंबीय आणि चाहते मागणी करत आहे.

आता सुशांतच्या मृत्यूप्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणेला अद्याप या प्रकरणात काही खास माहिती मिळालेली नाही. या तपासाला अंतिम रूप देण्यात ते अपयशी आहे. सीबीआयने विचारलेल्या प्रश्नांवर अमेरिकेकडून कोणतेही उत्तर नाही. यामुळे गेल्या तीन वर्षांपासून तपास प्रलंबित असल्याचं या प्रकरणाशी परिचित असलेल्या लोकांनी सांगितले.

2021 मध्ये प्रीमियर अँटी करप्शन एजन्सीने कॅलिफोर्निया येथे असलेल्या मुख्यालय Google आणि Facebook यांना औपचारिक विनंती पाठवली होती. ज्यात त्यांना सुशांतने डिलिट केलेले सर्व चॅट, ईमेल किंवा पोस्टची माहिती देण्यात सांगितली ज्याचे विश्लेषण करून त्यांना घटनांची पार्श्वभूमी समजण्यास मदत होईल.

sushant singh rajput
Aaliya Siddiqui On Kangana Ranaut: 'तिला सवयचं आहे नाक खुपसायची' कंगनावर भडकली नवाजची बायको

14 जून 2020 रोजी ज्या सुशांतने मुंबईतील त्यांच्या अपार्टमेंटमध्ये आत्महत्या केली होती. भारत आणि यूएस मध्ये परस्पर कायदेशीर सहाय्य करार (MLAT) आहे, ज्या अंतर्गत दोन्ही बाजूंना कोणत्याही देशांतर्गत तपासात माहिती मिळू शकते.

sushant singh rajput
Satyaprem Ki Katha Collection: सत्तुच्या कथेला मिळेल का प्रेक्षकांचे प्रेम? पहिल्या दिवसाचे कलेक्शन म्हणतंय...

हिंदुस्तान टाईम्सच्या दिलेल्या माहितीनुसार, सीबीआय अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्ही अजूनही या तांत्रिक पुराव्यावर अमेरिकेच्या प्रतिसादाची वाट पाहत आहोत, ज्यामुळे आम्हाला हे प्रकरण तार्किक निष्कर्षापर्यंत नेण्यात मदत होईल. यामुळेच या प्रकरणाला अंतिम स्वरूप देण्यास विलंब होत आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये सीबीआयने या प्रकरणातील माहितीसाठी अमेरिकन अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.

त्यातच आता सुशांत सिंगच्या कुटुंबाचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ वकील विकास सिंग यांनी देखील, त्यांना तांत्रिक पुराव्याच्या विनंतीबद्दल माहिती नाही.

सुशांत सिंगच्या कुटुंबाचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ वकील विकास सिंग म्हणाले की, तांत्रिक पुराव्याच्या विनंतीबद्दल त्यांना माहिती नाही, परंतु ते पुढे म्हणाले की, "सीबीआय (प्रकरणाला) संथपणे मृत्यू देण्याचा प्रयत्न करत आहे." म्हणजेच या प्रकरणाला कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न होत आहे की काय अशी चर्चा आता होऊ लागली आहे.

sushant singh rajput
Bigg Boss OTT 2: बिग बॉस आहे की लस्ट स्टोरी? जैद हदीद अन् आकांक्षाच्या लिप किस अन् बरचं काही..

दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत असा दावा केला की, काही व्यक्तींनी दावा केला आहे की या प्रकरणाशी संबंधित त्यांच्याकडे पुरेसे पुरावे आहेत आणि राज्याने त्यांच्याशी संपर्क साधला आहे आणि त्यांना पोलिसांकडे तक्रार करण्याची विनंती केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.