सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानीला अंतरिम जामीन मंजूर

त्यानंतर तो तपासयंत्रणाच्या रडारवर आला होता.  
sidhartha pithani and sushant singh rajput
sidhartha pithani and sushant singh rajput Team esakal
Updated on

मुंबई - बॉलीवूडचा दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या (bollywood actor sushant singh rajput) आत्महत्या (sucide) प्रकरणातील संशयित आरोपी असणा-या सिद्धार्थ पिठानीला अखेर अंतरिम जामीन (intrem bail) मंजूर करण्यात आला आहे. त्यानं यापूर्वी जामीनासाठी अर्ज केला होता. त्यानंतर त्यानं लग्नाचे कारण सांगून त्याला जामीन मिळाला आहे. त्यानंतर त्याला 2 जूलैला पुन्हा कोर्टात हजर राहावं लागणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. पिठानीला एनआयबीनं चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात काही महत्वाची माहिती मिळेल अशी शक्यता तपासयंत्रणेला आहे. (sushant singh rajput friend siddharth pithani granted interim bail)

सुशांत सिंग राजपूत याचा संबंध काही ड्रग्ज डिलरशी (durgs dealer) होता अशी माहिती तपासयंत्रणेला मिळाली होती. त्यानंतर त्यांनी याप्रकरणात आधिक चौकशीसाठी सिद्धार्थला ताब्यात घेतले होते. पिठानीला लग्नासाठी 15 दिवसांसाठी अंतरिम जामीन मिळाला आहे. याबाबत अधिक माहिती देताना सिद्धार्थच्या वकीलांनी सांगितले, मानवी हक्क कायद्यानुसार त्याला जामीन मिळाला आहे. त्यानंतर 2 जुलैला त्याला कोर्टात पुन्हा हजर व्हावे लागणार आहे.

सिद्धार्थनं यापूर्वी देखील कोर्टात जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र कोर्टानं तो अर्ज अमान्य केला होता. येत्या 26 जूनला त्याचे लग्न आहे. हे कारण पुढे करत त्यानं न्यायालयाकडून जामीन घेतला आहे. आपल्याला या प्रकरणात गैरसमजूतीमुळे अडकवण्यात आले आहे. आपण काहीही केलेलं नाही. आपल्याला फसवण्यात येत असल्याचे पिठानीचे म्हणणे आहे.

sidhartha pithani and sushant singh rajput
अक्षय कुमार काश्मीरमध्ये; सैनिकांसोबत केला भांगडा

पिठानीनं बराचकाळ एनसीबीला चकवा दिला होता. सोशल मीडियाचा आधार घेत एजन्सी त्याच्यापर्यत पोहचली. सुशांतची आत्महत्या झाल्याचे कळताच त्यानं आपलं अकाऊंट डिलिट केलं होतं. त्यानं पुन्हा यावर्षी एप्रिलमध्ये नवीन अकाऊंट तयार केले. त्यावर काही फोटोही पोस्ट केले होते. त्यानंतर तो तपासयंत्रणाच्या रडारवर आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.