Sushant Singh Rajput Birthday: आज दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा वाढदिवस. सुशांतच्या स्मृती अजूनही तितक्याच ठळक आहेत. किंबहुना त्याने केलेलं काम आणि त्याची माणुसकी पाहता त्याला कधीच आणि कुणीच विसरणं शक्य नाही. सुशांत आपल्यातून गेला मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला. त्याच्या मृत्यूचे गुठ अजूनही उलगडले नसले तरी त्याची एक इच्छा मात्र अपुरी राहिली.. त्याच विषयी आज जाणून घेऊया.. (Sushant Singh Rajput last wish to make science movie chanda mama door ke)
सुशांतने खूप कमी वेळात बॉलीवूडमध्ये नाव कमावलं. छोट्या पडद्यापासून सुरू झालेला त्याचा प्रवास बॉलीवूडच्या सुपरहिट 'छिछोरे' सिनेमापर्यंत येऊन पोहोचला. पुढे 'दिल बेचारा' हा त्याचा शेवटचा सिनेमा ओटीटीवर आला आणि सगळेच हळहळले. पण हा काही त्याचा शेवटचा सिनेमा नव्हता, खरा सिनेमा तर त्याच्या कल्पनेत होता, जो करणं ही त्याची शेवटची इच्छा होती.
हेही वाचा : जगायचं कसं हे सांगण्यासाठी हवं 'लिव्हिंग विल'
सुशांत बांद्रा येथील एका आलिशान अपार्टमेंटमध्ये राहत होता. त्यानं त्या घराला खुप मनापासून सजवलेलं होतं. त्या घरात त्याच्या घराच्या बालकणीला लागून हॉलमध्ये कोपऱ्यात एक टेलिस्कोप होता.
सुशांत हा वैज्ञानिक नसताना त्याने घरात इतका प्रोफेशनल टेलिस्कोप कशासाठी? ठेवला हा अनेकांना प्रश्न पडला आणि त्याची शेवटची इच्छा समोर आली.
सुशांत विज्ञानप्रेमी होता. अभिनेता असला तरी त्याने इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले होते. तो सिनेमात प्रचंड मेहनत करून पैसे कमावत होता कारण त्याला स्वतःचा चित्रपट करायचं होता. जो विज्ञानावर आधारित असेल.
'चंदा मामा दूर के' असं ह्या सिनेमाचं नाव त्याने निश्चित केलं होतं. या चित्रपटासाठी तो प्रचंड अभ्यास करत होता शिवाय चित्रपट पूर्ण करण्यासाठी वाटेल ते करायची त्याची तयारी होती. याबाबत स्वतः दिग्दर्शक अभिषेक चौबे यांनी माहिती दिली होती.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.