''होय,आमचं ब्रेकअप झालं आहे''-सुश्मिता सेन

सोशल मीडियावर तिने केलेली पोस्ट चर्चेत आहे.
Sushmita Sen,Rohman Shawl
Sushmita Sen,Rohman ShawlGoogle
Updated on

ती दिसायला जितकी सुंदर तितकीच तिची बुद्धीही तल्लख...म्हणजे अगदीच इंग्लिशमध्ये बोलायचं झालं तर 'ब्युटी विथ ब्रेन'...अशा सुंदर सुश्मिता सेनच्या(Sushmita Sen) आयुष्यात ब्रेकअप होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही पण वयानं बराच लहान असलेल्या तिच्या या बॉयफ्रेंडसोबत तब्बल चार वर्ष तिचं नातं टिकलं होतं हे ही नाकारून चालणार नाही. रोहमन हा तिच्यापेक्षा वयानं जवळ-जवळ पंधरा वर्ष लहान होता. त्यामुळं जेव्हा या दोघांंचं सूत जुळलं होतं तेव्हा हे सुश्मिताचं नातं फार काळ टिकणार नाही अशा चर्चांना उधाण आलं होतं. पण त्यानंतर अनेक प्रसंगांमधनं जसजसं या दोघांचं नातं बहरत गेलं तेव्हा मात्र यांच्या नात्यासंबंधी बोलल्या जाणा-या नकारात्मक बातम्यांना लगाम लागला.

Sushmita Sen,Rohman Shawl
हॉट सई ताम्हणकर खादी जम्पसूटमध्ये दिसलीय खूपच स्टायलिश..

रोहमन हा सुश्मितासोबत तिच्या घरीच राहत होता. त्याचं तिच्या दत्तक मुलींशी आणि पालकांशीही चांगले संबंध होते असं बोललं जात आहे. अनेकदा सुश्मिताही सोशल मीडियावर त्याची तारिफ करताना दमायची नाही. पण मग असं असताना अचानक काय झालं की रोहमन रातोरात सुश्मिताचं घर सोडून गेला,आणि मित्राकडे राहू लागला. तसं गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये काहीतरी बिनसलंय अशी चर्चा होती खरी. सुश्मिताने फेब्रुवारी महिन्यात एक पोस्ट टाकली होती जी त्यांच्या नात्यात दुरावा येत चाललाय असं काहीसं दर्शवणारी होती. पण त्यांनतर हे दोघे एका कार्यक्रमात एकत्र दिसले आणि चर्चांना विराम मिळाला.

पण आज अचानक सुश्मिताने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोघांचा एकत्रित असा क्युट फोटो टाकून आपलं ब्रेकअप झाल्याची बातमी कन्फर्म असल्याचं जाहीर केलं. तिनं लिहिलंय,''आमच्या नात्याची सुरुवात मित्र म्हणून झाली आणि आता आम्ही यापुढे मित्र म्हणूनच ओळखले जाऊ. प्रेमाचं अनेक वर्षांचं नातं आता संपलं आहे''. तिनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय,We began as friends, we remain friends!! 🤗👍 The relationship was long over…the love remains!!😇❤️#nomorespeculations #liveandletlive #cherishedmemories #gratitude #love #friendship 😊❤️🌈
I love you guys!!!😍 #duggadugga. सुस्मिताची 'आर्या २' ही वेबसिरीज नुकतीच प्रदर्शित झाली आहे. आणि यातील तिच्या अभिनयाचं सर्व स्तरातून कौतूकही केलं जातं आहे. आता एवढीच इच्छा की बाईंनी ब्रेकअपच्या दुःखातून स्वतःला लवकर सावरावे आणि आयुष्य मार्गस्थ लावावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.